PCMC : महापालिकेत यशवंत डांगे, किरणकुमार मोरे यांची प्रतिनियुक्ती

एमपीसी न्यूज  – वाई नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी (PCMC ) अधिकारी किरणकुमार मोरे आणि कराड नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत डांगे यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रतिनियुक्तीवर नियुक्ती झाली आहे. मोरे यांच्याकडे ड क्षेत्रीय कार्यालयाचे प्रशासन अधिकारी पदाचा कार्यभार देण्यात आला आहे. तर, सहायक आयुक्त डांगे यांच्याकडे आरोग्य विभागाचा पदभार दिला आहे.

Pune : खुनाचा प्रयत्न केलेल्या फरार आरोपींना पिस्टलसह अटक

ड क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी तथा सहायक आयुक्त उमाकांत गायकवाड यांची ठाणे महापालिकेत उपायुक्त म्हणून पदोन्नतीने बदली झाली आहे. त्यामुळे त्यांना पालिका सेवेतून कार्यमुक्त करण्यात आले आहे. किरणकुमार मोरे आणि यशवंत डांगे यांची पालिकेत प्रतिनियुक्तीवर नियुक्ती झाली (PCMC ) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.