PCMC : महापालिका कर्मचाऱ्यांची दसऱ्यापूर्वीच दिवाळी

8.33 टक्के सानुग्रह अनुदान, 20 हजार जादा रक्कम जाहीर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका (PCMC) कर्मचाऱ्यांना 8.33 टक्के सानुग्रह अनुदान आणि जादा 20 हजार रुपये रक्कम देण्यात येणार आहे. आयुक्त शेखर सिंह यांनी हा निर्णय घेतला. त्यामुळे साडेआठ हजार कर्मचा-यांची दस-यापूर्वीच दिवाळी होणार आहे.

पिंपरी – चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघ आणि पिंपरी – चिंचवड महापालिका यांच्यात पंचवार्षिक वेतन करार झाला आहे. 2020-21 ते 2024-25 पर्यंत हा करार आहे. दोनवर्षापूर्वी करार करताना पाच हजार रुपयांनी सानुग्रह अनुदानात वाढ केली होती. त्यानुसार वर्ग 1 ते 4 मधील अधिकारी, कर्मचाऱ्यांना 8.33 टक्के सानुग्रह अनुदान आणि जादा 20 हजार रुपये रक्कम देण्यास आयुक्तांनी मान्यता दिली आहे. या बोनसचा महापालिकेतील साडेआठ हजार कर्मचा-यांना लाभ होणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Kasarwadi : जलतरण तलाव दुर्घटना; एजन्सीला नोटीस, गुन्हाही दाखल करणार

शाखाधिकारी व शाखाप्रमुख यांनी 2023-24 च्या अंदाजपत्रकामध्ये सानुग्रह अनुदान व जादा रक्कम अदाईगी करण्याच्या लेखा (PCMC ) शीर्षकाखाली केलेली तरतूद अपुरी पडल्यास तरतूद वर्गीकरणाची कारवाई करावी. तसेच 8.33 टक्के सानुग्रह अनुदान आणि जादा 20 हजार रुपये रक्कम सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळी पूर्वी मिळेल याची दक्षता घ्यावी.

त्याबाबतची बिले तयार करून तातडीने लेखा विभागाकडे सादर करावीत. लेखा विभागाने तातडीने बिले तपासून रक्कम अदाईगी संदर्भातील कार्यवाही करावी. बिलांच्या विलंबाबाबत शाखा प्रमुखांना जबाबदार धरण्याचा इशारा आयुक्तांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.