Kasarwadi : जलतरण तलाव दुर्घटना; एजन्सीला नोटीस, गुन्हाही दाखल करणार

एमपीसी न्यूज – कासारवाडीतील जलतरण(Kasarwadi ) गॅस गळती प्रकरणी तलावातील पाणी शुद्धीकरण, परिसर स्वच्छता, साफसफाई देखभाल व यांत्रिक देखभाल दुरुस्तीचे काम करणाऱ्या सुमित स्पोटर्स अॅन्ड फिटनेस इक्विपमेंट एजन्सीला नोटीस देण्यात आली आहे. तातडीने खुलासा मागविला असून गुन्हाही दाखल करण्यात येणार आहे.

महानगरपालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जलतरण तलाव(Kasarwadi)येथे क्लोरिन गॅसचे टाकीतून क्लोरीन गॅस गळती झाली. ही बाब जलतरण तलावावरील व्यवस्थापक, जीवरक्षक यांचे लक्षात येताच जलतरण तलावामधील 16 नागरिकांना तातडीने बाहेर काढले. यापैकी 12, नागरीक 4 जीवरक्षक, 1 सुरक्षारक्षक यांना त्रास जाणवू लागल्याने यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल करण्यात आले. दाखल केलेल्या सर्वांची प्रकृती स्थिर आहे. तसेच टाकीतून होणाऱ्या गॅस गळतीवर तातडीने नियंत्रण मिळविण्यात आले.

Honda : होंडाच्या स्पोर्टी लूकच्या Honda Dio125 व SP160 बाजारात

जलतरण तलावातील पाणी शुद्धीकरण, परिसर स्वच्छता, साफसफाई देखभाल व यांत्रिक देखभाल दुरुस्तीचे काम सुमित स्पोटर्स अॅन्ड फिटनेस इक्विपमेंट यांना नेमून दिलेले आहे. क्लोरिन गॅसची टाकी अत्यंत जुनी गंजलेली खराब अवस्थेत असल्याने याबाबत काम करणा-या एजन्सीने आवश्यक खबरदारी न घेता हलगर्जीपणा केल्याचे निदर्शनास आले आहे. या एजन्सीला नोटीस दिलेली असून खुलासा येवुन हलगर्जीपणाबाबत जबाबदार धरून सक्त कारवाई करण्यात येणार आहे. त्याचबरोबर नागरीकांना इजा होईल, जीवीतास धोका होइल अशी परिस्थिती निर्माण करण्यास जबाबदार असल्याने सुमित स्पोटर्स अॅन्ड फिटनेस इक्विपमेंटस, चिंचवड यांचे विरुद्ध भोसरी पोलिस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात येत असल्याचे महापालिका प्रशासनाने कळविले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.