PCMC : दिव्यांग कल्याणकारी योजनेतंर्गत ‘हयातीच्या दाखल्याचे’ घरोघरी जाऊन होणार सर्वेक्षण

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (PCMC ) समाज विकास विभाग दिव्यांग कक्षाच्या वतीने विविध दिव्यांग कल्याणकारी योजना राबविणेत येतात. या योजनेअंतर्गत महापालिकेच्या हद्दीतील विविध दिव्यांग योजनांचा लाभ घेणा-या दिव्यांग व्यक्तींचा “हयातीचा दाखल्या” बाबत त्यांचे घरोघरी जाऊन समक्ष सर्वेक्षण करणेत येणार आहे.

सर्वेक्षण हे लाभ घेणा-या व नोंदणीकृत असलेल्या महापालिका हद्दीतील दिव्यांग व्यक्तींचे घरोघरी जाऊन अक्षांश व रेखांश वर नोंदी घेवून तसेच गुगल टॅगिंग नुसार करण्यात येणार आहे. यामध्ये दिव्यांग व्यक्तींचे फेस रिडींग, थंम्ब इंम्ब्रेशन व आयरीस ओळख डोळ्यांमार्फत ऑनलाईन नोंद घेणेत येणार असून तसेच त्यांचे दिव्यांग प्रमाणपत्र / आधार कार्ड, आधार कार्ड, मतदान कार्ड इ. स्कॅन करून ऑनलाईन वर अपडेट करणेत येणार आहे. लाभार्थ्यांचे नाव व पत्ता आधार नंबर, मोबाईल नंबर तसेच पालकांचे पुर्ण नाव, पत्ता व आधार नंबर, मोबाईल नंबर याच्या नोंदी (PCMC) घेवून या नुसार सर्वेक्षण करणेत येणार आहे.

Pune : सोम्या-गोम्याच्या टीकेला उत्तर देत नाही; अजित पवार यांनी संजय राऊत यांना सुनावले

ज्या दिव्यांग लाभार्थ्यांचा राहण्याचा पत्ता, मोबाईल नंबर बदललेला असेल अशा लाभार्थ्यांनी तात्काळ योग्य त्या पुराव्यासह लेखी अर्ज मुख्य कार्यालयात सादर करावा. महापालिकेकडे विविध योजनेत लाभ घेणारे दिव्यांग नागरिकांनी हयातीचा दाखला सर्वेक्षण बाबत महापालिकेने मे.अल्टवाईज प्रा.लि. या संस्थेची नेमणूक केलेली असून संस्थेचे ओळखपत्र धारक सर्वेअर हे शहरातील विविध योजनेत लाभ घेणारे दिव्यांग नागरीकांच्या घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणार आहेत.

त्यांना दिव्यांग नागरीकांनी सर्वोतोपरी सहकार्य करावे. संबंधित सर्व दिव्यांग नागरीकांनी आपले मुळ आधारकार्ड, दिव्यांग प्रमाणपत्र,आधार कार्ड, लाभार्थ्यांचा मतदान कार्ड (वय वर्ष 18 पुढील) तसेच पालकांचे मतदान कार्ड, राहण्याचा पत्ता पुरावा, मोबाईल नंबर इ. कागदपत्रे सर्वेक्षण वेळी उपलब्ध करून देणे अनिवार्य आहे.

दिव्यांग नागरीकांनी हयातीचा दाखल्या बाबत होणा-या सर्वेक्षणासाठी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे तसेच काही अडचणी असल्यास 8459834929 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन समाज विकास विभाग, दिव्यांग कक्षाचे सहाय्यक आयुक्त श्रीनिवास दांगट यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.