Pune : सोम्या-गोम्याच्या टीकेला उत्तर देत नाही; अजित पवार यांनी संजय राऊत यांना सुनावले

एमपीसी न्यूज – सोम्या-गोम्याच्या टीकेला उत्तर देत नाही, अशा (Pune )शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांना सुनावले.

शेतकरी आक्रोश मोर्चाची सांगता राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत झाली. त्यावेळी मविआचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते.

त्यावेळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Pune)यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली होती की, ” आमच्या पाडापाडीच्या राजकारणात तुम्ही पडू नका, हवा तो बहुत तेज चल रही है अजितराव, टोपी उड जाएगी अशी टीका केली होती. राऊतांच्या टीकेला अजित पवार यांनी उत्तर दिले. मी सोम्या-गोम्याच्या टीकेला उत्तर देत नाही, अशा शब्दांत सुनावले.

Chinchwad : कष्टकऱ्यांनो, पेन्शन आणि सामाजिक सुरक्षेसाठी संघर्ष करा – मेधा पाटकर

पुण्यातील पेरणेफाटा येथे ऐतिहासिक विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी पवार आले होते. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. २०२४ मध्ये पहिल्यांदा लोकसभा पार पडणार आहे. त्याबाबत काही सर्व्हे आलेत ते देखील आपण पाहिले आहेत.

नुकत्याच पाच राज्यांच्या निवडणुका पार पडल्या त्याचे निकाल आपण पाहिले आहेत. त्यामुळे देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाशिवाय पर्याय नाही, असेही पवार यांनी सांगितले.

राजकारणाच्या ठिकाणी राजकारण ठीक आहे. मात्र, कारण नसताना विरोधाला विरोध करून काही तरी वेगवेगळ्या प्रकारचे आरोप करायचे ही जी काय पद्धत अलीकडच्या काळात सुरू झाली आहे. ती काही योग्य नाही.

एखादी गोष्ट चुकली असेल तर सर्व मंत्रिमंडळाची ती दुरुस्त करण्याची तयारी आहे. पण, कारण नसताना बदनामी करण्याचे काम, गैरसमज पसरवण्याचे काम, वस्तुस्थिती तशी नसताना काही तरी अफवा पसरवण्याचे काम हे अलीकडच्या काळात कुठे तरी चाललंय ते कुठं तरी थांबल पाहिजे, हे आपल्या महाराष्ट्राच्या हिताचे नाही, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.