PCMC : अधिकारी, कर्मचा-यांच्या उत्तम कामकाजामुळे नागरिकांना उत्कृष्ठ सेवा – अतिरिक्त आयुक्त जगताप

एमपीसी न्यूज – सेवानिवृत्त होणा-या अधिकारी (PCMC) आणि कर्मचा-यांच्या वर्षांनुवर्षे सातत्याने केलेल्या उत्तम कामकाजामुळे महापालिकेची प्रगती होऊन नागरिकांना उत्कृष्ठ सेवा देण्यास महापालिका सक्षम झाली असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी केले.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने माहे जानेवारी 2023 अखेर सेवानिवृत्त होणा-या 33कर्मचा-यांचा सत्कार अतिरिक्त आयुक्त जगताप यांच्या हस्ते दिवंगत मधुकरराव पवळे सभागृह येथे करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमास सह आयुक्त आशादेवी दुरगुडे, सहाय्यक आयुक्त वामन नेमाणे, कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, कर्मचारी महासंघाच्या चारुशीला जोशी, शेखर गावडे, रमेश लोंढे तसेच कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचा-यांचे नातेवाईक उपस्थित होते.

माहे जानेवारी 2023 मध्ये नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणा-या (PCMC) अधिकारी आणि कर्मचा-यांमध्ये कार्यकारी अभियंता प्रशांत पाटील, प्रविण घोडे, मुख्याध्यापिका शैला मातेरे, कार्यालय अधिक्षक राजू चंदीरामानी, तानाजी खानवरे, सिस्टर इनचार्ज सुधा तळेकर, कनिष्ठ अभियंता स्थापत्य विश्वनाथ राऊत, मुख्य लिपिक सुभाष नाणेकर, उपशिक्षिका रेखा चौधरी, भांडारपाल रविंद्र शिलेवंत, सुरक्षा सुपरवायझर दुंदाजी तारडे, वायरमन शिवाजी वारंगुळे, इलेक्ट्रीक मोटार पंप ऑपरेटर प्रकाश जाधव, रखवालदार भिमराव गाजरे, मजूर ज्ञानेश्वर गवळी, अधिकराव शिंदे, रामचंद्र कदम, सफाई कामगार अमिना शेख, शशिकला गायकवाड यांचा समावेश आहे.

Bhosari News : दुरुस्तीसाठी संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल उद्यापासून बंद

तसेच स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या कर्मचा-यांमध्ये लेखापाल राजश्री देशपांडे, उपशिक्षक विजय कुंजीर, मुकादम भिमराज जगताप, शिपाई कैलास देसले, आया राधा मेरगू, सफाई कामगार प्रेमलता बिगानिया, मंगल पवार, विमल शिंदे, सफाई सेवक कांताबाई डुलगज, मिलिंद रोकडे, सुखपाल जिनवाल, कचरा कुली हंसराज गायकवाड, उत्तम गंगावणे, हनुमंत सुरवसे यांचा समावेश आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी तर आभार कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.