Hawkers biometric survey : फेरीवाला बायोमेट्रिक सर्वेक्षणास टाळाटाळ करणाऱ्यावर कारवाई करा 

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवड शहरातील साधारण 3200 पेक्षा अधिक पथ विक्रेत्यांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण मनपाने टाळाटाळ केल्याने रखडले होते.(Hawkers biometric survey) त्यामुळे महानगरपालिकेकडून त्यांच्यावरती अन्यकारक कारवाई सुरू होती ही कारवाई थांबवा व त्यांनाही बायोमेट्रिक सर्वेक्षण करून फेरीवाला प्रमाणपत्र द्या अशी मागणी कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी मनपा आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.

फेरीवाला बायोमेट्रिक सर्वेक्षणास टाळाटाळ करणाऱ्यावर कारवाई करा या व इतर मागणीसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.  माननीय उच्च न्यायालयाने सन 2012 आणि 14 मध्ये ज्यांचे सर्वेक्षण झाले आहे अशा विक्रेत्यांचे बायोमेट्रिक पूर्ण करण्याचे आदेश दिले होते . त्यानुसार 25 जुलै 2022 ते 31 ऑगस्ट 2022 पर्यंत सर्वेक्षण करण्याची मुदत वृत्तपत्रांमध्ये देऊन सर्व अ ब क ड ई फ ग ह सर्व क्षत्रिय कार्यालयांना सर्वेक्षणाचे आदेश देण्यात आले मात्र क्षेत्रीय कार्यालयाकडून केवळ टाळाटाळ केली जात आहे.

गरीबांना वंचित ठेवण्यात येत आहे .मनपाकडून ज्यांची नावे क्षेत्रीय कार्यालयाकडे पाठवली त्यांचे सर्वेक्षण करणार असे सांगून उर्वरीत सर्वेक्षण केले जात नाही आणि त्यांच्याकडे कार्यालयांकडे महानगरपालिकेकडून फक्त 70, 80, 90 एवढीच नावे एका प्रभागांमध्ये पाठवले असल्याने हे जाणून बुजून सर्वेक्षण (Hawkers biometric survey) टाळण्यात येत आहे व गरजूंना वंचित ठेवले जात आहे . तसेच क्षेत्रीय अधिकारी व क्षेत्रीय कार्यालयातील कर्मचारी हे फेरीवाल्यांना टाळत आहेत आणि सर्वेक्षण आता होणार नाही असे सांगत आहेत किंवा आम्ही तुम्हाला फोन केल्याशिवाय ऑफिसला यायचं नाही अशा प्रकारच्या सूचना देऊन परत पाठवत आहेत हे अत्यंत चुकीचे असून कायद्याचा व न्यायालयाचा अवमान करणारे आहे.

Pune : ‘एक गाव एक वाचनालय’ उपक्रमासाठी पुस्तके दान करण्याचे आवाहन

आता सुमारे दीड महिन्याच्या कालावधीमध्ये आठही क्षत्रिय कार्यालय मिळून फक्त 200 सर्वेक्षण झालेले असल्याची माहिती आहे, त्यामुळे या गंभीर बाबीकडे आपण लक्ष देऊन संबंधित अधिकाऱ्याला तातडीत सूचना द्याव्या तसेच या सर्वेक्षणात  कसूर करणाऱ्या भुमि जिंदगी विभाग व क्षेत्रीय कर्मचारी यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी.(Hawkers biometric survey) अशी मागणी कामगार नेते काशिनाथ नखाते, कार्याध्यक्ष इरफान चौधरी, राजू बिराजदार, फरीद शेख, किरण साडेकर, अंबादास जावळे, यासीन शेख आदींनी केली आहे .

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.