Electricity Contract Workers : कोरोना काळात काम केलेल्या वीज कंत्राटी कामगारांना नोकरीत प्राधान्य देण्याची मागणी

एमपीसी न्यूज – महावितरण, महापारेषण, महानिर्मिती या तिन्ही वीज कंपनीतील नियमित रिक्त पदांवर हजारो वीज कंत्राटी कामगार (Electricity Contract Workers) व सुरक्षा रक्षक यांनी कोरोना काळात आपला जीव धोक्यात घालून काम केले. त्यामुळे पुढे नोकऱ्या देताना कोरोना काळात काम केलेल्या कंत्राटदार कामगारांना प्राधान्य द्यावे, अशी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघांने राज्याचे उपमुख्यमंत्री व उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, वीज सेवा ही अत्यावश्यक सेवेत येते. ही सेवा देताना राज्यभरात सुमारे 65 कंत्राटी कामगार केवळ कोरोना काळात कर्तव्यावर असताना मृत्युमुखी पडले. कोरोना काळात पोलीस, हॉस्पिटल, कोव्हीड सेंटर, लॅबोरेटरीज् ,आरोग्य यंत्रणा व अन्य सर्व शासकीय व नागरी सुविधांना लागणारा वीज पुरवठा व यंत्रणा सुरळीत ठेवण्यात या वीज कंत्राटी कामगारांचे देखील मोठे योगदान होते. या शासनाच्या अत्यावश्यक वीज सेवेत काम केलेल्या या कोविड योद्ध्यांनी निसर्ग आणि तोंक्ते वादळात देखील शासन सेवेसाठी अत्यंत महत्त्वाची व मोलाची भुमिका बजावली. त्यामुळे उर्जाखात्याचे मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उर्जा खात्यातील कोरोना काळात कार्यरत वीज कंत्राटी कामगारांना देखील शासन सेवेत सामावून घ्यावे, त्यांना प्राधान्य द्यावे व न्याय मिळवून द्यावा.

Hawkers biometric survey : फेरीवाला बायोमेट्रिक सर्वेक्षणास टाळाटाळ करणाऱ्यावर कारवाई करा 

तत्पूर्वी कंत्राटी कामगारांना राज्यभर कंत्राटदाराकडून (Electricity Contract Workers) होत असलेल्या आर्थिक मानसिक शोषणातून तणावमुक्त करत त्यांना कंत्राटदार मुक्त शाश्वत रोजगार द्यावा. अशी राज्यातील सर्व वीज कंत्राटी कामगारांना आहे. यासाठी संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा आयोजीत करावी अशी मागणी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघांचे अध्यक्ष नीलेश खरात व सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी पत्राद्वारे केलेली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.