Kalapini talegaon : प्रा. शिरीष अवधानी यांच्या प्रथम स्मृती दिनी आठवणी दाटतात या पुस्तकाचे प्रकाशन

एमपीसी न्यूज : कै. प्रा. शिरीष अवधानी यांच्या स्मृतीलेखांच्या आठवणी दाटतातया पुस्तकाचे प्रकाशन कलापिनी सांस्कृतिक केंद्रात संपन्न झाले.(Kalapini talegaon) अहमदनगर येथील सेवाभावी संस्था स्नेहालयचे डॉ. गिरीश कुलकर्णी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर प्रकाशिका योगिता अवधानी पाटील, संपादक प्रकाश बोकील उपस्थित होते. यावेळी कलापिनीचे अध्यक्ष विनायक अभ्यंकर, कार्याध्यक्षा अंजली सहस्त्रबुद्धे,विश्वस्त डॉ. अनंत परांजपे, श्रीमंत सरदार वृशालीराजे दाभाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ कुलकर्णी म्हणाले,” शिक्षक, मार्गदर्शक कसा असावा? विद्यार्थ्यांवर शिक्षकाचा प्रभाव असल्याने त्याच्या जीवनात अमुलाग्र बदल कसा होतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे प्रा. शिरीष अवधानी. अवधानी सरांनी अनेक उत्तमोत्तम विद्यार्थी घडवले. इतकंच नाही तर सरांनी अनेकांना प्रेरणा देऊन त्यांच्यामध्ये असणाऱ्या गुणांचे दर्शन घडवले आहे.” देणगी देणाऱ्याने स्वत:ला महान न समजता, वंचित घटकांना मदत करण्याची संधी मिळाल्याबद्दल कृतज्ञ राहावे असा विचार डॉ. कुलकर्णी यांनी मांडला.

Electricity Contract Workers : कोरोना काळात काम केलेल्या वीज कंत्राटी कामगारांना नोकरीत प्राधान्य देण्याची मागणी

प्रकाश बोकील यांनी पुस्तकाची संकल्पना, लेखांचे स्वरूप सांगून अवधानी यांच्या स्मृतींना उजाळा दिला. योगिता अवधानी – पाटील यांनी या पुस्तकाच्या निर्मितीमागील हेतू सांगितला.(Kalapini talegaon) अगदी साध्या साध्या गोष्टीतून मोठे काम कसे उभे राहू शकते याविषयी त्या बोलल्या. डॉ. परांजपे यांनी आपल्यातील उर्जेचा सकारात्मक उपयोग करणे गरजेचे असल्याचे सांगितले.

डॉ. विनया केसकर यांनी सूत्रसंचालन केले. अशोक बकरे यांनी आभार मानले. यावेळी नयना आभाळे, संदीप सोनिगरा, प्रशांत दिवेकर आदींनी मनोगत व्यक्त केले.(Kalapini talegaon) विनायक लिमये यांनी गीत सादर केले. विराज सवाई, रश्मी पांढरे, रवींद्र पांढरे, प्रतिक मेहता, अनघा बुरसे, श्रीपाद बुरसे, सायली रौंधळ आदींनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी योगदान दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.