Vikas Dhakane : अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांची बदली; स्मिता झगडे अतिरिक्त आयुक्त

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील प्रशासकीय राजवट लांबणीवर पडली असताना पालिका प्रशासनात मोठी खांदेपालट झाली आहे. अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे (Vikas Dhakane) यांची त्यांच्या मूळ विभागात बदली झाली आहे. तर, त्यांच्या जागी महापालिकेच्या उपायुक्त स्मिता झगडे यांची अतिरिक्त आयुक्तपदी वर्णी लागली आहे. याबाबतचे आदेश राज्याच्या नगरविकास विभागाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी-छापवाले यांनी आज (मंगळवारी) काढले आहेत. तसेच सहाय्यक आयुक्त बाळासाहेब खांडेकर, प्रशांत जोशी यांचीही बदली झाली आहे.

भारतीय रेल्वे सुरक्षा सेवेतील (IRPFS) विकास ढाकणे यांची 12 फेब्रुवारी 2021 रोजी पिंपरी-चिंचवड पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी प्रतिनियुक्तीने नियुक्ती झाली होती. त्यांनी 15 फेब्रुवारी रोजी पदभार स्वीकारला होता. तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांच्यासोबतच ढाकणे यांनीही पदभार स्वीकारला होता. राजेश पाटील यांचे निकटवर्तीय अशी ढाकणे यांची ओळख होती. राज्यात सत्तापालट झाल्यानंतर 16 ऑगस्ट 2022 रोजी पाटील यांची तडकाफडकी बदली झाली. नवीन आयुक्त शेखर सिंह यांच्याशी ढाकणे यांचे सूत जुळले नाही. पाटील यांच्या बदलीनंतर एका महिन्याच्या आतमध्येच अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांचीही बदली झाली आहे.

ढाकणे (Vikas Dhakane) यांची महापालिका अतिरिक्त आयुक्तपदावरील प्रतिनियुक्ती संपुष्टात आणली आहे. त्यांच्या सेवा त्यांच्या मूळ प्रशासकीय विभागाकडे प्रत्यार्पित केल्या आहेत. त्यांच्याजागी महापालिकेच्या उपायुक्त स्मिता झगडे यांची प्रशासकीय कारणास्तव अतिरिक्त आयुक्तपदी नेमणूक करण्यात आली आहे. स्मिता झगडे या महापालिकेत सहाय्यक आयुक्त, उपायुक्त होत्या. आता त्यांची अतिरिक्त आयुक्तपदी वर्णी लागली आहे.

Electricity Contract Workers : कोरोना काळात काम केलेल्या वीज कंत्राटी कामगारांना नोकरीत प्राधान्य देण्याची मागणी

तर, प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब खांडेकर यांची पुण्यातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) येथे प्रादेशिक अधिकारीपदी बदली झाली आहे. भूमी आणि जिंदगी विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत जोशी यांची ठाण्यातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ येथे प्रादेशिक अधिकारीपदी बदली झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.