PCMC: महापालिकेचे विभागप्रमुख ‘या’ वेळेत नागरिकांना भेटणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अधिका-यांनी (PCMC) दुपारी 4 ते 5 या वेळेत नागरिकांना भेटावे. ती वेळ नागरिकांसाठी राखून ठेवावी. नागरिकांसाठी राखून ठेवलेल्या भेटीचा कालावधी सर्व कार्यालयांनी त्यांच्या सूचना फलकावर ठळकपणे लावावा. प्रत्येक नागरिकांचे म्हणणे पुरेसा वेळ देऊन ऐकून घ्यावे. दौरे व भेटीसाठी आठवड्यातील ठराविक दिवस निश्‍चित करावा, असा आदेश आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिला आहे.

 

Talegaon Dabhade : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी सुसंगत – डाॅ पंडित विद्यासागर 

 

नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, माजी नगरसेवक, पदाधिकारी, ठेकेदार व त्यांचे प्रतिनिधी अधिकारी व विभागप्रमुखांना भेटण्यासाठी पालिका भवनात येतात. मात्र, दौरा, मिटींग, साईट व्हीजीट, रजा आदी विविध कारणांमुळे अधिकारी नागरिकांना भेटत नाहीत. हेलपाटे मारूनही अधिकारी भेटत नसल्याने कामे अडतात. त्यामुळे अधिकाऱ्यांबाबत नाराजी वाढत आहे. त्यामुळे त्रस्त झालेले नागरिक आयुक्तांना भेटतात. परिणामी, आयुक्तांना भेटणाऱ्यांची संख्या वाढत आहे. ही बाब प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीने अशोभनीय आहे.

 

 

 

महापालिकेचे अनेक अधिकारी व विभागप्रमुख नागरिकांना भेटत नाहीत. त्यांच्या तक्रारींची दखल घेतली जात नसल्याने संबंधित नागरिक थेट आयुक्तांना भेटतात. नागरिकांची भेट टाळण्याचे प्रकार घडू नये म्हणून सर्व अधिकारी व विभागप्रमुखांनी खबरदारी घ्यावी. नागरिकांना भेटीसाठी राखीव वेळ ठेवावी, यासंदर्भात सूचना फलक लावावा, असे आदेश आयुक्त शेखर सिंह (PCMC) यांनी दिले आहेत.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.