PCMC News : महापालिकेतर्फे क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांना अभिवादन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने (PCMC News) क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंती निमित्त त्यांच्या चिंचवड स्टेशन येथील पुतळ्यास अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

माजी नगरसदस्या अनुराधा गोरखे, उप आयुक्त रविकरण घोडके, विशेष अधिकारी किरण गायकवाड, कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष संजय ससाणे, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे, सामाजिक कार्यकर्ते मनोज तोरडमल,नितीन घोलप, सुनिल भिसे, नाना कसबे, यादव खिलारे, डॉ.धनंजय भिसे, संतोष जोगदंड, अरूण जोगदंड, जीवन बोऱ्हाडे, सागर तापकीर, दत्तु चव्हाण,सतिश भवाळ,संदीप जाधव,अनिल सौदंडे, दशरथ सकट, स्वप्नील जाधव, सविता आव्हाड, मीना खिलारे, ज्योती वैरागर, केशरताई लांडगे आदी उपस्थित होते.

MLA Sunil Shelke : ग्रामपंचायत स्तरावरील विकास कामांना गती देण्यासाठी आमदार सुनिल शेळके यांनी घेतली आढावा बैठक 

“मरेन तर देशासाठी आणि जगेन तर देशासाठी” अशी क्रांतिकारी घोषणा करणारे क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे हे देशभरात हजारो क्रांतिकारक तयार करणारे प्रखर देशभक्त होते.(PCMC News) त्यांची देशाप्रती अढळ निष्ठा,त्यागाचा आदर्श सर्वांनी घ्यावा असे अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ म्हणाले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शाहीर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये शाहीर बापू पवार आणि लखन अडागळे यांनी क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे (PCMC News) यांच्या जीवनावर आधारित प्रबोधनात्मक शाहिरी सादर केली तर शिवशाहीर मिलिंद ठोंबरे आणि त्यांच्या सहका-यांनी मर्दानी खेळ सादर केले. त्यामध्ये तलवारबाजी, दांडपट्टा,ढाल तलवार अशा विविध युद्ध कला त्यांनी सादर केल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष संजय ससाणे यांनी केले. तर, सूत्रसंचालन आणि आभार प्रफुल्ल पुराणिक यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.