PCMC : महापालिकेचा अर्थसंकल्प मंगळवारी  सादर होणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्यावतीने सन 2024-25 या आर्थिक वर्षाचे अर्थसंकल्प तयार ( PCMC) करण्याचे पूर्ण झाले आहे. येत्या मंगळवारी (दि. 20) सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. संगणक प्रणालीद्वारे ई-बजेट तयार करण्यात आले आहे.

Pune : कॅब चालकांच्या संपामुळे प्रवाशांची गैरसोय होणार नाही; उबरचे स्पष्टीकरण

महापालिकेचा 42 वा अर्थसंकल्प आहे. महापालिकेत 13 मार्च 2022 पासून प्रशासकीय राजवट सुरू आहे. त्यामुळे 2023-24 चा अर्थसंकल्प आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनीच सादर केला होता.  आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या नेतृत्वात दुस-यांदा अर्थसंकल्प सादर होणार आहे. तसेच प्रशासकीय राजवटीमधील दुसरा  अर्थसंकल्प असणार आहे.

महापालिकेचे 2022-23 मध्ये 6 हजार 497 कोटी 2 लाख तर 2023-24 मध्ये अंदाजपत्रकात वाढ होऊन 7 हजार 127 कोटी 88 लाखांचे झाले होते. त्यामुळे 2024-25 या आर्थिक वर्षांच्या अंदाजपत्रकात वाढ होते की घट होते हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार ( PCMC) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.