Pune : कॅब चालकांच्या संपामुळे प्रवाशांची गैरसोय होणार नाही; उबरचे स्पष्टीकरण

एमपीसी न्यूज – प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने कॅब चालकांसाठी (Pune)  जो दर ठरवला आहे, त्याची अंमलबजावणी केली जात नसल्याने पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील कॅब चालकांनी 20 फेब्रुवारी पासून संप पुकारला आहे. त्यामुळे दोन्ही शहरांमधील प्रवाशांची गैरसोय होईल, असे म्हटले जात होते. त्यावर उबर कंपनीने स्पष्टीकरण देत या संपामुळे प्रवाशांची गैरसोय होणार नसल्याचे म्हटले आहे.

पुण्याच्या प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने एसी कॅबसाठी किमान दर ठरविला आहे. 1 जानेवारी पासून नवीन दराची अंमलबजावणी करण्याचे आदेशदेखील संबंधित कंपनीला दिले होते, मात्र पुण्यातील कोणत्याही कंपनीने त्याची अंमलबजावणी केलेली नाही. दरम्यान 20 फेब्रुवारीपासून पुण्यात कॅब चालकांचा संप घेण्यावर ठाम असल्याचे इंडियन गिग वर्कर्सचे अध्यक्ष डॉ. केशव क्षीरसागर यांनी सांगितले.

Nigdi : कोयता घेऊन घरातील सामानाची तोडफोड केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने पुण्यातील कॅबसाठी जो दर ठरविला आहे, त्या दराची अंमलबजावणी झालीच पाहिजे, असा आदेश पुणे आरटीओ प्रशासनाने संबंधित कॅब कंपनीच्या प्रतिनिधींना दिला आहे. नवीन दराची अंमलबजावणी करण्यासाठी कंपन्यांनी थोड्या दिवसांची मुदत मागितली आहे. दरम्यान, इंडियन गिग वर्कर्स फ्रंटने 20 फेब्रुवारीपासून ‘आरटीओ’समोर निदर्शने करून कॅब सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

पुण्याच्या प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने एसी कॅबसाठी किमान दर ठरविला आहे. 1 जानेवारी पासून नवीन दराची अंमलबजावणी करण्याचे आदेशदेखील संबंधित कंपनीला दिले होते, मात्र पुण्यातील कोणत्याही कंपनीने त्याची अंमलबजावणी केलेली नाही. दरम्यान 20 फेब्रुवारीपासून पुण्यात कॅब चालकांचा संप घेण्यावर ठाम असल्याचे इंडियन गिग वर्कर्सचे अध्यक्ष डॉ. केशव क्षीरसागर यांनी (Pune RTO) सांगितले.

याबाबत उबर कंपनीकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. 20 फेब्रुवारी पासून पुकारण्यात आलेल्या संपामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील प्रवाशांची गैरसोय होणार नाही. प्रवाशांच्या सेवेसाठी आम्ही कटिबद्ध असल्याचेही कंपनीकडून सांगण्यात आले (Pune)  आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.