PCMC : आजी-माजी सैनिकांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी आता स्वतंत्र कक्ष

एमपीसी न्यूज –  पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील रहिवाशी (PCMC ) स्वातंत्र्यसैनिक, शहीदांचे कुटुंबातील सदस्य, आजी-माजी सैनिक यांच्या विविध समस्या, अडचणी सोडविण्यासाठी तसेच सैनिकांसाठी योजना तयार करण्यासाठी महापालिकेच्या वतीने स्वतंत्र कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या अध्यक्षतेखाली 11 जणांची समिती नेमण्यात आली असून कक्षाच्या अध्यक्षपदी क्रीडा विभागाचे उपायुक्त मिनिनाथ दंडवते यांची नेमणूक करण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका हददीत 20 स्वातंत्रसैनिक, 9 शहीदांची कुटूंबे आणि सुमारे 1500 आजी-माजी सैनिक वास्तव्यास आहेत. कार्यरत सैनिकांपैकी अनेकांची कुटुंबे महापालिका हद्दीत वास्तव्य करतात.

IFFI : गोव्यातील ‘इफ्फी’ महोत्सवासाठी माध्यम प्रतिनिधींना नाव नोंदणीचे आवाहन

स्वातंत्र्यसैनिक, शहीद, आजी-माजी सैनिक यांच्या विविध समस्या, अडचणी सोडविण्यासाठी तसेच सैनिकासाठी योजना तयार करण्यासाठी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी 11 जणांची समितीही नेमण्यात आली आहे.

स्वातंत्र्यसैनिक, शहीदांचे कुटुंबीय, आजी-माजी सैनिक यांच्या विविध समस्या, अडचणी सोडविण्यासाठी, तक्रार अर्ज स्वीकारण्यासाठी पालिका मुख्यालय स्तरावर तसेच 8 क्षेत्रिय कार्यालय स्तरावर प्रत्येक महिन्याचे तक्रार अर्ज स्वीकारणे व समस्या जाणुन घेऊन कार्यवाही करणे, या उपक्रमाच्या कामकाजाचे समन्वय करणे, समितीच्या बैठकांचे नियोजन करावे. दर तीन महिन्यांनी प्रलंबित प्रकरणांचा आढावा कक्ष प्रमुखांनी घ्यावा.

पालिकेच्या 2024-2025 या अर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकामध्ये स्वातंत्रसैनिक, शहीद, माजी सैनिक यांच्यासाठी राबवयाच्या विविध योजनांसाठी तरतुद स्वतंत्र लेखाशिर्षाखाली अंदाजपत्रकात करण्यासाठी मुख्य लेखा व वित्त अधिकारी, लेखा विभाग यांच्याकडे संबंधित विभाग प्रमुखांची महिन्यातून एकदा बैठक घेऊन घ्यावी, असा आदेश आयुक्त सिंह (PCMC ) यांनी दिला आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.