Mahavitran : ऐन सणासुदीत 35 पैशांनी प्रति युनिट वीज दरवाढ, इंधन समायोजन आकार करणार वसूल

एमपीसी न्यूज – ऐन सणासुदीच्या काळात महावितरणने प्रतियुनिट 35 पैशांनी दरवाढ( Mahavitran)  करण्याचा निर्णय घेतला आहे. वीज खरेदी खर्चात वाढ झाल्याने महावितरणकडून वीजबिलांत इंधन समायोजन आकार वसूल केला जाणार आहे.

PCMC : आजी-माजी सैनिकांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी आता स्वतंत्र कक्ष

यासंदर्भात महावितरणच्या मुख्य अभियंतांनी (वीज खरेदी) आदेश काढले आहेत. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे महावितरणकडून सप्टेंबरच्या वीजबिलात इंधन समायोजन आकार वसूल केला जाणार आहे, असे या आदेशात म्हटले आहे. ही वसुली येत्या काही महिन्यांत सुरू राहणार आहे.

त्यामुळे दारिद्र्यरेषेखालील, तसेच पाचशे युनिटपेक्षा अधिक वीज वापरकर्त्यांवरही परिणाम होणार आहे. यासोबतच कृषी वीजजोडणी असलेल्या ग्राहकांना प्रति युनिट दहा व पंधरा पैसे, तर औद्योगिक ग्राहकांना ( Mahavitran ) प्रति युनिट 20 पैसे जादा द्यावे लागणार आहेत.

असे असेल घरगुती ग्राहक प्रति युनिट दरवाढ

0 ते 100 युनिट 5 पैसे
101 ते 300 युनिट 25 पैसे
301 ते 500 युनिट 35 पैसे
501 युनिटपासून पुढे 35 पैसे

https://www.youtube.com/shorts/c0BESYCRuck

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.