PCMC : शिक्षक,मुख्याध्यापक व शिक्षण विभागामधील दुवा म्हणून काम करण्याची संधी;  मेंटॉर टीचर उपक्रम

एमपीसी न्यूज – विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये गुणात्मक बदल(PCMC) होण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका शिक्षण विभागाकडून विविध उपक्रम राबविण्यात येतात. याचबरोबर, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील शिक्षकांना सातत्यपुर्ण व्यावसायिक मदत मिळावी, यासाठीही ‘मनपा’च्या शिक्षण विभागाकडून विविध उपक्रम राबविण्यात येत असतात.
शैक्षणिक गुणवत्तेमध्ये वाढ होण्यासाठी शिक्षण विभागामार्फत (PCMC)सध्या ‘मेंटॅार टीचर’ (कोअर टीम) हा उपक्रम सुरू करण्यात येत असून, सदर उपक्रमामध्ये इच्छुक शिक्षकांनी गुरुवार, दिनांक 29 फेब्रुवारीपर्यंत नावनोंदणी करावी, अशी माहिती शिक्षण विभागाचे साहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात यांच्याकडून देण्यात आली.

Pune : ‘हाय- टेक वे फॉरवर्ड’ हे सुनील खांडबहाले यांनी लिहिलेले पुस्तक मार्गदर्शक ठरू शकेल – डॉ. रघुनाथ माशेलकर

”सदर उपक्रमांतर्गत निवडण्यात आलेले ‘मेंटॉर टीचर’ हे शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचे, वर्गभेटी करून वर्ग निरीक्षण व चर्चा यांद्वारे प्रत्यक्ष मदत करण्याचे काम करणार आहेत. त्यासोबतच, गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी विविध शैक्षणिक कार्यक्रम तयार करून त्याची अंमजबजावणी करणे, अशा प्रकारच्या विविध शैक्षणिक कामाद्वारे शिक्षण विभागाला मदत करण्याची संधी मिळणार आहे”, असेही थोरात यांनी सांगितले.

‘मेंटॉर टीचर’साठी ‘या’ आहेत संधी…

• ‘मनपा’तील विविध शाळांसोबत काम करण्याची संधी
• शिक्षक, मुख्याध्यापक व शिक्षण विभाग यांच्यामधील शैक्षणिक दुवा म्हणून काम करण्याची संधी
• शिक्षण क्षेत्रातील नवनवीन प्रयोगामध्ये सहभागी होण्याची संधी
• नवीन गोष्टी शिकणे-शिकविणे
• वर्ग भेटीद्वारे व प्रशिक्षणाद्वारे शिक्षकांना मदत करण्याची संधी
• विविध नावीन्यपूर्ण शाळांना भेटी देऊन नवोपक्रमांचे अनुभव
चौकट – ‘मेंटॅार टीचर’साठी अशी आहे पात्रता…
‘मेंटॉर टीचर’ या उपक्रमामध्ये पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शाळांमध्ये पूर्णवेळ व नियमित नियुक्त असणारे व किमान ७ वर्षे सेवा पूर्ण केलेले शिक्षक अर्ज करू शकतील. इच्छुक शिक्षकांनी https://forms.gle/fcMwrmR3sc4CjYCE6 या लिंकद्वारे गुरुवार, दिनांक 29 फेब्रुवारी रोजीपर्यंत  नावनोंदणी आणि अर्ज करण्याचे शिक्षण विभागाने आवाहन केले आहे. सदर प्रक्रियेमध्ये इच्छुक शिक्षकांस कोणत्याही प्रकारची शंका व अडचण असल्यास पर्यवेक्षिका सुनंदा मगर यांच्या सदर मोबाइल क्रमांकावर 8055626569 संपर्क करावा.

‘मेंटॅार टीचर’ उपक्रमातून शिक्षकांसाठी विविध संधी…

ज्या शिक्षकांची ‘मेंटॉर टीचर’ म्हणून निवड करण्यात येईल, त्या शिक्षकांना नवनवीन गोष्टी शिकायला मिळणार आहेत. शिक्षकांना नावीन्यपूर्ण उपक्रम पाहण्यासाठी शैक्षणिक अभ्यास दौरे अनुभवायला मिळणार आहेत. त्यासोबतच मनपा शाळांतील पूर्ण वर्षाचे शैक्षणिक नियोजन तयार करण्यात व अंमलबजावणी करण्यामध्ये सहभाग नोंदवता येणार आहे. यासोबत निपूण भारत अभियान अंमजबजावणी, शिक्षक प्रशिक्षण, वर्ग निरीक्षण करून शिक्षकांना मदत करण्याची संधी व सोबतच शिक्षण विभागासोबत काम करण्याची संधी मिळणार आहे.
शेखर सिंह,
आयुक्त,
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

लेखी चाचणी व मुलाखतीद्वारे ‘मेंटॉर टीचर’ यांची होणार निवड

‘मेंटॉर टीचर’ (कोअर टीम) उपक्रमांतर्गत निवड झालेल्या शिक्षकांना आपल्या वर्गाची जबाबदारी नसून, त्यांना पूर्णवेळ आपल्या शाळेसोबत इतर शाळेतील शिक्षकांना मदत करण्याचे काम असणार आहे. निवड प्रक्रियेद्वारे ‘मेंटॉर टीचर’ यांची निवड केली जाणार असून, सर्वप्रथम इच्छुक शिक्षकांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यानंतर अर्जांची छाननी करून लेखी चाचणी व वैयक्तिक मुलाखतीद्वारे निवड जाहीर करण्यात येणार आहे.
प्रदीप जांभळे-पाटील,
अतिरिक्त आयुक्त,
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.