PCMC School : 67 शाळांमध्ये गणवेशाचे वाटप

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (PCMC School) बालवाडी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे गणवेश महापालिकेला ठेकेदाराकडून प्राप्त झाल्यानंतर वाटप सुरू आहे. पालिकेच्या 67 प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप पूर्ण झाले आहे. तसेच, उर्वरित 38 शाळेतील विद्यार्थ्यांनाही दोन दिवसात गणवेशाचे वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेचे शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी दिली.

शहरात महापालिकेच्या बालवाडी, प्राथमिक, माध्यमिक शाळा आहेत. या शाळांमध्ये 41 हजार 230 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. दिवाळीची सुट्टी आली, तरी पालिका शाळेतील गोरगरीब विद्यार्थी शालेय साहित्यापासून वंचित होते.

Khadakwasla Murder : कामगाराचा खून करून मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकला; सात जणांना अटक

सर्वसामान्य कुटूंबातील मुले हक्काच्या गणवेशापासून वंचित (PCMC School) असल्याबाबत नागरिकांमधून ओरड सुरू होती. ठेकेदारांकडून गणवेश मिळताच पालिकेच्या शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना दोन गणवेश, दोन पीटी गणवेश, 1 स्वेटरचे वाटप सुरू केले आहे. आत्तापर्यंत 67 शाळांमधील मुलांना गणवेशाचे वाटप पूर्ण झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.