Gahunje : अहमदनगर येथील हॉस्पिटलवर दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या आरोपींना गहुंजे येथून अटक

एमपीसी न्यूज – अहमदनगर येथील पोळ हॉस्पिटलच्या डॉक्टरांना धमकावून दरोडा (Gahunje) टाकण्याचा कट रचणाऱ्यांना सहा जणांना दरोडा विरोधी पथकाच्या पोलिसांनी वेळीच अटक केली आहे. या कटासाठी हालचाली सुरु असतानाच पोलिसांनी आरोपींना मंगळवारी (दि.18) गहुंजे गाव येथून अटक केली आहे.

पुनीतकुमार विवेक शेट्टी (वय 29 रा.वाकड), आफताब मेहबुब शेख (वय 21 रा. वाकड), रुपेश राजेश गायकवाड (वय 21 रा.चिंचवड),शुभम लक्ष्मण दाते (वय 19 रा.चिंचवड),सचिन बबन जायभाये (वय 24 रा.शेवगाव. अहमदनगर), साहिल हरिदास शिंदे (वय 20 रा.वाकड) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

Khadakwasla Murder : कामगाराचा खून करून मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकला; सात जणांना अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींना अहमदनगर येथील (Gahunje) अमरापूर फाट्यावरील पोळ हॉस्पिटलवर दरोडा टाकायचा होता. तेथील डॉक्टरला शस्त्राचा धाक दाखवून लुटण्याचा कट त्यांनी रचला होता. त्यासाठी परिसराची पाहणी देखील झाली होती. साधारण रविवार ते मंगळवार या कालावधीत हा कट रचण्यात आला होता. त्यासाठी लागणाऱ्या शस्त्रांची जुळवा-जुळव आरोपी करत होते.

साहिल हा गहुंजे गाव (Gahunje) येथे जिवंत काडतुसे घेण्यासाठी आला. तेथे काडतुसे न मिळाल्याने त्याने जगन सेनानी (पुर्ण नाव माहिती नाही) याला फोन पे द्वारे पुनितकुमार याच्या मोबाईलवरून 20 हजार रुपये पाठवले. या साऱ्या भनगडी सुरु असताना दरोडा विरोधी पथकाच्या पोलिसांना याचा सुगावा लागला. पोलिसांनी त्वरीत कारवाई करुन आरोपींना जेरबंद केले व आरोपींचा दरोड्याचा कट उधळला. आरोपींवर शिरगाव परंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून दरोडा विरोधी पथक पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.  

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.