Khadakwasla Murder : कामगाराचा खून करून मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकला; सात जणांना अटक

एमपीसी न्यूज : उत्तम नगर पोलीस ठाण्याच्या (Khadakwasla Murder) हद्दीत एका वाळू उपसा करणाऱ्या कामगाराचा खून करून त्याचा मृतदेह रस्त्याच्या कडेला असणाऱ्या एका चारीत फेकून दिला होता. 10 ऑक्टोबर रोजी ही घटना उघडकीस आली होती. या प्रकरणी पोलिसांनी आता सात जणांना अटक केली आहे. वाळू उपसा करणाऱ्या कामगारांमध्ये भांडण झाल्यानंतर त्यातील एकाचा खून करण्यात आला. खडकवासला परिसरात ही घटना घडली होती.

ओमकार लक्ष्मण सुपेकर (वय 22) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी अजय उर्फ पप्पू राजेंद्र पवार, बाळासाहेब उर्फ बाळू भाऊ गजरे, निखिल उर्फ सोन्या एकनाथ चोरे, विजय नामदेव गांजरे, रोहित ढिले, गणेश माणिक शिंदे आणि सचिन आदिनाथ कापसे यांना अटक करण्यात आली आहे.

PMAY : मोशी आणि वाल्हेकरवाडी येथील घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, खडकवासला धरण परिसरातील एका इमारतीच्या मागील बाजूला 10 ऑक्टोबर रोजी एका तरुणाचा मृतदेह आढळला होता. उत्तम नगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर याप्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान तपास सुरू असताना पोलिसांनी तांत्रिक (Khadakwasla Murder) माहितीआधारे वरील आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत त्यांनी खून केल्याची कबुली दिली. वाळू उपसण्याच्या वादातून भांडण झाले आणि भांडणाच्या रागातून खून झाल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी या सातही आरोपींना अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.