PCMC : महापालिका घेणार विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांमधील (PCMC) विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी, त्यांचे शारिरीक आणि मानसिक आरोग्यसाठी शिक्षण विभागाने पुढाकार घेतला आहे. त्याकरिता कला शिक्षक, शारिरीक शिक्षणाची माहिती देणारे शिक्षक, कार्यानुभव आणि समुपदेशक अशा 132 शिक्षकांची आगामी शैक्षणिक वर्षांपासून नियुक्ती करण्यात येणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू माध्यमांच्या एकूण 105 प्राथमिक तर 18 माध्यमिक शाळा आहेत. या शाळांमध्ये 42 हजार पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थी संख्या मोठी असताना पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी शिक्षकांची संख्या कमी आहे. त्यामुळे पालिकेने यापूर्वी अडीचशे कंत्राटी शिक्षकांची भरती केली.

Pune : पुणे दक्षिण विभागाच्या पाणीपुरवठ्याचे नवीन वेळापत्रक ; विभागवार पद्धतीने पाणीबंदचा निर्णय

याबाबत शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी संजय नाईकडे म्हणाले, महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी विविध प्रयत्न केले जात आहे. याच धर्तीवर आगामी शैक्षणिक वर्षांपासून विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढविण्यासाठी, त्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी 33 कला शिक्षक, 33 शारिरीक शिक्षक, 33 कार्यानुभव आणि 33 समुपदेशका अशा 132 शिक्षकांची कंत्राटी पध्दतीने भरती करण्यात येणार आहे. यासाठी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी धोरणात्मक निर्णय (PCMC) घेतला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.