Pune : पुणे दक्षिण विभागाच्या पाणीपुरवठ्याचे नवीन वेळापत्रक ; विभागवार पद्धतीने पाणीबंदचा निर्णय

एमपीसी न्यूज- पुणे महापालिकेने पाणी बचतीसाठी दर गुरुवारी (Pune)  संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय  घेतला असून त्याची 18 मे पासून अंमलबजावणी सुरू झाली आहे. मात्र भौगोलिक रचना, पंपिंग आणि वितरण व्यवस्थेमधील तांत्रिक अडचणींमुळे वडगांव बुद्रुक विभागातील वडगांव बुद्रुक, धनकवडी, आंबेगाव पठार, आगम मंदिर, बालाजीनगर, कात्रज, सुखसागरनगर, कोंढवा बुद्रुक, येवलेवाडी, अप्पर इंदिरानगर परिसरातील पाणीपुरवठा गुरुवारी एकाच दिवशी बंद ठेवून दुसऱ्या दिवशी (शुक्रवारी) पाणीपुरवठा सुरळीत करणे महापालिकेचे अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे या भागात विभागवार पद्धतीने पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय पाणीपुरवठा विभागाने घेतला असून आठवड्यातील कोणत्या वारी कोणत्या भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार याचे वेळापत्रक पाणीपुरवठा विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे.

Today’s Horoscope 23 May 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

वडगाव बद्रुक विभागाच्याच पाणीपुरवठ्यात बदल झाला असून हा भाग वगळता शहराच्या अन्य भागात दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. नव्या फेररचनेमुळे सिंहगड रस्ता परिसराबरोबर सातारा रस्ता, सहकारनगर, बालाजीनगर, धनकवडी, कात्रज, सुखसागरनगर, अप्पर इंदिरानगर या दक्षिण पुण्याचा पाणीपुरवठा वेगवेगळ्या दिवशी बंद राहणार आहे.या निर्णयाची अंमलबजावणी येत्या गुरुवारपासून (दि.25) केली जाणार आहे, अशी माहिती पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी दिली.

 

विभागवार पद्धतीने पाणीपुरवठा बंदचे वेळापत्रक

सोमवार- सुदत्त संकुल परिसर, तुकाईनगर, जाधवनगर, दामोदरनगर, विश्रांतीनगर, गोयल गंगा, आनंद विहार, हिंगणे परिसरा, आनंदनगर, रामनगर, महावीनगर, कांडगे पार्क, मोहिते टाऊनशिप, खोराडवस्ती परिसर, वडगांव बुद्रुक परिसर, चव्हाणबाग, डीएसके रस्ता, व्यंकटेश सेरेनिटी परिसरा, हायब्लीस सोसायटी,नांदेड फाटा परिसर, राजयोग सोसायटी, आनंद मंगल कार्यालय, अभिरूची परिसर, समर्थनगगर, दांगटनगर, नारायणबाग परिसर, धायरी, सनसिटी रस्ता परिसर, विठ्ठलवाडी परिसरा, ओंकार गार्डन परिसरा, अमतृतानगर, सावरकरनगर, नॅशनल पार्क, माणिकबाग, चरवड वस्ती, सिंहगड काॅलेज परिसर, आंबेगाव बुद्रुक, शिवसृष्टी परिसर, विकासनगर, घुलेनगर, निवृत्तीनगर, विष्णूपूरम, तुकाईनगर.

मंगळवार- आगम मंदिर परिसर, संतोषनगर, अंजलीनगर, दत्तनगर, जांभूळवाडी रस्ता, दत्तनगर-आंबेगाव रस्ता परिसर, वंडर सिटी परिसरा, साईनगर, आचलफार्म.

बुधवार- बालाजीनगर, श्रीहरी सोसायटी, गुरूदत्त सोसायटी, निवारी सोसायटी, साईकृपा सोसायटी, गुलमोहर सोसायटी, पवार हाॅस्पिटल परिसर, संपूर्ण आंबेगाव पठार परिसर, राजे चौक, महाराणा प्रताप चौक, दत्तनगर भुयारी मार्ग, चंद्रभागानगर, त्रिमूर्ती चौक, भारती विहार सोसायटी, भारती विद्यापीठा मागील परिसर.

गुरुवार- सहकारनगर भाग 1, दाते बस स्टाॅप परिसर, धनकवडी सर्वेक्षण क्रमांक 7,8,2,3 धनकवडी गावठाण, बाळकृष्ण सोसायटी, सौदागर 1सोसायटी, राजमुद्रा सोसायटी, दौलतनगर, कलानगर, गुलाबनगर, चैतन्यनगर, सह्याद्रीनगर,आदर्शनगर, (Pune) प्रतिभानगर.

शुक्रवार- गुजरवाडी निंबाळकर वस्ती, भारतनगर, दत्तनगर, वरखडेनगर, जाधवनगर, उत्कर्ष सोसायटी, शेलारमळा, सुंदरबन सोसायटी, महादावेनगर, माऊलीनगर, शिवशंभोनगर, आनंदनगर, विद्यानगर, महावीरनगर, राजस सोसायटी, वाघजाईनगर, सुखसागनरगर भाग 1, आंबा माता मंदिर परिसर, निरंजन सोसायटी, निलया सोसायटी, मॅजिक टाॅवर, गंगा ओसियन, बनकर शाळेजवळील परिसर, स्वामी समर्थनगर.

शनिवार- साईनगर, गजानन नगर, राजीव गांधी नगर, काकडे वस्ती, लक्ष्मीनगर, आश्रफनगर, ग्रीनपार्क, सुखसागर नगर भाग 2, वाघजाईनगर, गोकुळनगर, शिवशंभोनगर, पवन पार्क सोसायटी, यशश्री सोसायटी, श्रीकृष्ण कालनी, शिक्षक सोसायटी, कोंढवा बुद्रुक गावठाण, वटेश्वर मंदिर परिसर, उन्नतीधाम सोसायटी, पार्श्वनगर, सोमनाथनगर, अजमेरा पार्क, पवननगर, अंबिकानगर, सरगम नगर, बिलाल मस्जिद परिसर, शिवरायनगर, शांतीनगर सोसायटी आणि महानंदा.

रविवार- टिळेकरनगर, कामठे पाटील नगर, कोलते पाटील सोसायटी, आकृती सोसायटी, मिनू मेहतानगर, बधेनगर, खडी मशीन चौक, पिसोळी रस्ता, ईस्काॅन मंदिर परिसर, प्रतिभा सोसायटी, उन्नती सोसायटी, कपीलनगर, आंबेडकरनगर, कोंढवा बुद्रुक (अंशत: भाग), पारगेनगर, एच ॲण्ड एम सोसायटी, शोभा गार्नेट सोसायटी, शोभा आयवरी सोसायटी, तालाब कंपनी परिसरा, सागर कामठेनगर, पुण्यधाम आश्र्ममनगर, टायनी इंडस्ट्रीय परिसर, वाघ वस्ती, श्रद्धानगर, विष्ण ठोसर नगर, सोमजी बसस्टाॅप.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.