Today’s Horoscope 23 May 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 23 May 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग –

वार – मंगळवार

23.05.2023.

शुभाशुभ विचार- 12 पर्यंत चांगला दिवस

आज विशेष- विनायक चतुर्थी. ( अंगारक योग)

राहू काळ – दुपारी 3.00 ते 4.30.

दिशा शूल – उत्तरेस असेल.

आजचे नक्षत्र – आर्द्रा 6.05 पर्यंत नंतर पुनर्वसु.

चंद्र राशी – मिथुन.

—————————————-

मेष – ( शुभ रंग-  )

आज तुम्ही इतरांना मदत करण्यासाठी स्वतःचा वेळ व पैसा खर्च कराल. घर दुरुस्तीच्या काही कामात लक्ष घालावे लागणार आहे. सामाजिक कार्यकर्त्यांना लोकप्रियता मिळेल. बेरोजगारांना नोकरीचे कॉल येतील.

वृषभ (शुभ रंग- पिस्ता )

आज तुमची आर्थिक बाजू भक्कम असल्याने तुम्हाला प्रत्येक कामात चांगला उत्साह जाणवेल. लहान भावास आज तुमच्या मदतीची गरज भासेल. काही चांगल्या बातम्या येतील.

मिथुन ( शुभ रंग- डाळिंबी )

आज कार्यक्षेत्रात तुमच्या प्रगतीचा आलेख उंचावेल . अति स्पष्ट बोलल्याने आपलीच माणसे दुखावली जाण्याची शक्यता आहे. तुमची आर्थिक आवक जरी चांगली असली तरीही पैशाची उधळपट्टी करू नका.

कर्क (शुभ रंग- जांभळा.)

पैसा येण्याआधीच पैसा जाण्याचे मार्ग तयार असतील. दूरच्या प्रवासात आपल्या किमती वस्तू सांभाळा. घरातील थोरांशी काही वैचारिक मतभेद संभवतात. वाद आवरते घ्या.

सिंह (शुभ रंग- गुलाबी )

आज तुम्ही अगदी सहजच घेतलेले निर्णयही योग्य ठरतील. मित्र आज तुम्हाला दिलेली आश्वासने पाळतील. महत्त्वाचे आर्थिक व्यवहार दिवसाच्या पूर्वार्धातच उरकून टाका.

कन्या ( शुभ रंग- आकाशी)

उच्चशिक्षित तरुणांना आज मनासारख्या नोकऱ्यांचे प्रस्ताव येतील. निर्णय घ्यायला मात्र विलंब लावू नका. आज मित्र तुम्हाला दिलेला शब्द पाळतील छान दिवस आहे.

तूळ ( शुभ रंग- गुलाबी)

ऑफिसमध्ये अधिकारी वर्गास आज काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. अविश्रांत मेहनतीच्या जोरावर तुमची ध्येयाकडे वाटचाल चालूच राहील. कायद्याची चौकट मात्र मोडू नका.

वृश्चिक (शुभ रंग- मोरपिशी)

कार्यक्षेत्रात मनाविरुद्ध घडलेल्या काही घटना तुम्हाला बेचैन करतील. आज वरिष्ठांशी नमते घ्या व सहकाऱ्यांशी जुळवून घ्या. आज तुम्हाला सासुरवाडीकडून लाभ संभवतो.

धनु- (शुभ रंग- निळा)

आज तुम्ही आपल्या मर्यादेत रहा. अति आक्रमकतेने नुकसान होईल. संध्याकाळी वाहन चालवताना काळजी घ्या. मुलांनी कुसंगती पासून लांब राहावे, पालक तुम्हाला हिताचेच सल्ले देतील.

मकर ( शुभ रंग- जांभळा )

कार्यक्षेत्रात आज काही पेच प्रसंगांचा सामना करावा लागू शकतो. वैवाहिक जीवनात सौम्य मतभेद असतील. भागीदारीच्या व्यवहारात पारदर्शकता ठेवा. जोडीदाराच्या चुका काढण्यासाठी आजचा दिवस योग्य नाही.

कुंभ (शुभ रंग – लाल)

महत्त्वाची कामे आज दिवसाच्या पूर्वार्धातच उरकून घ्या. रुग्णांना असाध्य आजारावर योग्य डॉक्टर सापडेल. मुलांची शैक्षणिक प्रगती पाहून तुम्ही आनंदी व्हाल.

मीन -(शुभ रंग – लेमन )

आज तुम्हाला तुमची खोटी स्तुती करणारे मित्र भेटतील. भावनेच्या भरात कोणालाही वचने देऊन अडकू नका. हाती असलेला पैसा जपून वापरा मुलांचे ही अति लाड थांबवून त्यांच्या शिस्तीस प्राधान्य द्या.

शुभम भवतु 
श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क – 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.