Pdfa Football League : भारती एफसी, एएफए सॅमफोर्ड, पुणेरी वॉरियर्स, नॉइझी बॉईज उपांत्य फेरीत 

एमपीसी न्यूज –  नॉइझी बॉईज, पुणेरी वॉरियर्स, एएफए सॅमफोर्ड, भारती एफसी यांनी चमकदार विजयासह पीडीएफए (Pdfa Football League)   फुटबॉल लीगमध्ये  तृतिय श्रेणीतून उपांत्य फेरीत प्रवेश केला. 

 

 

MLA Anna Bansode : राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांचा फोन बंद आणि नेत्यांची धावपळ

 

स.प. महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या सामन्यात नॉइझी बॉईजने ओम पाटणकरने  (३८ आणि ४९वे) नोंदवलेल्या दोन गोलच्या जोरावर पीसीएच लायन्सचे आव्हान संपुष्टात आणले.
त्यानंतर पीयूष कुलकर्णी (46वे, 51वे) याच्या दोन गोलच्या मदतीने पुणेरी वॉरियर्सने सिटी एफसी पुणेचा 2-0 असा पराभव केला.
एएफए सॅनफोर्डने अमन मदुराईने (13वे) केलेल्या एकमात्र गोलच्या जोरावर लौकिक एफए संघाचा 1-0 असा पराभव करून आपली आगेकूच कायम राखली.

 

 

भारती एफसीने करण यादवच्या  (45वे, 55वे) जोरदार खेळाच्या जोरावर गॅलॅक्टिक वॉरियर्सचे आव्हान 2-1 असे संपुष्टात आणले. प्रतिक होसमनी (12वे) याने पराभूत संघाकडून एकमात्र गोल केला.
एसएसपीएमएस मैदानावर झालेल्या सामन्यात (Pdfa Football League) घोरपडी तमिळ युनायटेड आणि जाएंटस  यांच्यात झालेल्या द्वितीय श्रेणीतील सामन्यात 1-1 बरोबरी साधली.
घोरपडीकडून  तामिळ युनायटेड रॉबिन पिल्ले (३१वे) याने गेल केला,  तर जाएंटस ‘अ’कडून निखिल शेलार (३६वे) याने बरोबरी साधली.

 

 

निकाल
स.प. महाविद्यालय मैदान, तृतिय श्रेणी बाद फेरी

 

नॉईजी बॉईज : २ (ओम पाटणकर ३८वे, ४०वे) वि.वि. पीसीएच लायन्स : ०

 

पुणेरी वॉरियर्स : २ (पियुष कुलकर्णी ४६वेआणि ५१वे) वि.वि.  सिटी एफसी पुणे: ०

 

एएफए सॅमफोर्ड: 1 (अमन मदुराई 13वे) वि. वि. लौकिक एफ ए – 0

 

भारती एफसी : 2 (करण यादव 45वे, 55वे) वि.वि. गॅलॅक्टिक वॉरियर्स: 1 (प्रतिक होसमनी 12वे)
द्वितीय श्रेणी सुपर-8

 

उत्कर्ष क्रीडा मंच : ० बरोबरी वि. राहुल एफए ०

 

एफसी बेकडिन्हो: 2 (सौरभ पाटील 2रे; अंकुश आहुजा 38वे) बरोबरी वि. डेक्कन इलेव्हन ‘सी  2 (हर्षल दीक्षित 44वे सौरव पटवर्धन 58वे)

 

घोरपडी तामिळ युनायटेड: 1 (रॉबिन पिल्ले 31वे) बरोबरी वि जाएंटस’अ’: 1 (निखिल शेलार 36वे)

 

डायनामाइट्स: 1 (अनिकेत भारसाकळे 18वे) वि.वि. न्यू इंडिया सॉकर: 0

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.