Wakad : माहेरी जाण्यासाठी नकार दिल्याने महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज –  माहेरी जाण्यासाठी नकार दिल्याने (Wakad) वडिलांच्या ओळखीच्या व्यक्तीने महिलेचा विनयभंग केला. ही घटना 24 ऑक्टोबर 2021 रोजी थेरगाव येथे घडली. याप्रकरणी गुरुवारी (दि.9) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत 21 वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नजीर करीम फकीर (वय 52, रा. सांगली) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pimpri Corona Update : शहरात आज 50 नवीन रुग्णांची नोंद, 9 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज

फिर्यादीचे आई-वडील, भाऊ, इतर नातेवाईक आणि फिर्यादीच्या वडिलांचा ओळखीचा आरोपी नजीर हे फिर्यादीला माहेरी घेऊन जाण्यासाठी आले होते. फिर्यादीने माहेरी जाण्यासाठी नकार दिला. त्यामुळे वडील, भाऊ हाताला धरुन घराबाहेर नेत होते. आरोपी नजीर याने फिर्यादीस मिठ्ठी मारुन, घराबाहेर ढकलून दिले. फिर्यादीच्या मनास  लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. वाकड (Wakad) पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.