Pdfa Football League : तृतिय श्रेणीत पुणेरी वॉरियर्स विजेते

एमपीसी न्यूज – अत्यंत चुरशीने झालेल्या सामन्यात पुणेरी वॉरियर्सने टायब्रेकरमध्ये भारती एफसीचे आव्हान ६-४ असे मोडून काढत पीडीएफएच्या (Pdfa Football League) यंदाच्या मोसमातील तृतिय श्रेणीचे विजेतेपद मिळविले. 

 

एसएसपीएमएस मैदानावर झालेल्या सामन्यात नियोजित वेळेत सामना १ – १ असा बरोबरीत सुटला. त्यानंतर टायब्रेकरमध्ये पुणेरी वॉरियर्सकडून प्रशांत कवडे, अनिकेत गुप्ता, शंतनु खानापुरे, विकास गुप्ता, महाराणा रानडे यांनी आपल्या पेनल्टी अचूक साधल्या. भारती एफसीकडून अमनदीप सिंग, सिद्धार्थ गुप्ता, नान्गईसेन स्वेर यांनाच यश आले. भारतीकडून ए. प्रधान याला गोल करण्यात अपयश आले.
त्यापूर्वी, सामन्याच्या २३व्या मिनिटाला विकास तालेकेरी याने गोल करून पुणेरी वॉरियर्सला आघाडीवर नेले होते. मात्र, त्यांना ही आघाडी टिकवता आली नाही. सामन्याच्या ३३व्या मिनिटाला ए. प्रधान याने भारती एफसीला बरोबरी साधून दिली होती.

 

Weather Update : राज्यात पाच दिवसांत सोसाट्याच्या वाऱ्यांसह वादळाची शक्यता

 

जाएंटस अ संघाने द्वितीय श्रेणीतील (Pdfa Football League) सुपर ८चा एक सामना बाकी असतानाच आपल्या प्रथम श्रेणी प्रवेशावर शिक्कामोर्तब केले. जाएंटसने आज सहाव्या सामन्यात राहुल एफए संघाचा २-१ असा पराभव केला. त्यांचे स्पर्धेतील अपराजित्व कायम राहिले. दुसऱ्याच मिनिटाला गोल करणारा अभिजित धनवडे आणि १३व्या मिनिटाला आघाडी वाढवणारा अंशुल शर्मा त्यांच्या विजयाचे शिल्पकार ठरले. या दरम्यान आठव्या मिनिटाला रोहित जयसिंघानी याने गोल करून राहुल एफए संघाला बरोबरी साधून दिली होती.

 

जाएंटस अ संघाचा हा चौथा विजय होता. दोन अनिर्णित सामन्यांसह त्यांची गुणसंख्या आता १४ झाली आहे. त्यामुळे एक सामना शिल्लक असतानाच त्यांची पुढील मोसमासाठी प्रथम श्रेणीतील बढती निश्चित झाली आहे.

 

दरम्यान, घोरपडी तमिळ युनायटेड संघाला आज पहिल्या पराभवाचा सामना करावा लागला. एफसी बेकडिन्हो संघाने आज त्यांचा ४-१ असा पराभव केला. या पराभवामुळे त्यांची पात्रता अजून एक सामना लांबली. त्यांचे ११ गुण कायम राहिले.

 

 

एफसी बेकडिन्हो संघाकडून (Pdfa Football League) रुतिक राऊतने ३२ आणि ६४व्या मिनिटाला गोल केला. अंकुश अहुजा याने ४२ आणि ५२व्या मिनिटाला गोल करून संघाच्या विजयात आपला वाटा उचलला. घोरपडी तमिळ युनायटेड संघाकडून एकमात्र गोल प्रभु भंडारीने आठव्या मिनिटाला केला.

 

निकाल –

 

एसएसपीएमएस मैदान – अंतिम 

 

पुणेरी वॉरियर्स १ (५) (विकास तालेकेरी २३वे मिनिट) (टायब्रेकर – प्रशांत कवडे, अनिकेत गुप्ता, शंतनु खानापुरे, विकास गुप्ता, महाराणा रानडे) वि.वि. भारती एफसी १ (३) (ए. प्रधान ३३वे मिनिट) (टायब्रेकर – अमनदीप सिंग, सिद्धार्थ गुप्ता, नान्गईसेन स्वेर)

 

द्वितीय श्रेणी – सुपर एट

 

उत्कर्ष क्रीडा मंच ब १ (अंकुश पिंगळे ४२वे मिनिट) बरोबरी वि. डायनामाईट १ (अनिकेत भारसाकाळे १५वे मिनिट)

 

न्यू इंडिया सॉकर १ (विवियन भोसले १७वे मिनिट) बरोबी वि. डेक्कन इलेव्हन सी १ (आदित् परांजपे ४१वे मिनिट)

 

एफसी बेकडिन्हो ४ (रुतिक राऊत ३२ आणि ६४वे मिनिट, अंकुश अहुजा ४२ आणि ५२ वे मिनिट) वि.वि. घोरपडी तमिळ युनायटेड (प्रभु भंडारी ८वे मिनिट)

 

जाएंटस अ २ (अभिजित धनवडे दुसरे  मिनिट, अंशुल शर्मा १३वे मिनिट) वि.वि. राहुल एफए १ (रोहित जयसिंघांनी ८वे मिनिट)

 

महिला लिग –

 

युनायटेड पूना स्पोर्टस अकादमी २ (धनश्री लांडगे ३२ आणि ४६वे मिनिट) वि.वि. पुणे पायोनिर्स ०
सासवड एफसी ० बरोबरी वि. कमांडोज ०

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.