Women accident : क्रेनच्या धडकेत पादचारी महिलेचा मृत्यू

एमपीसी न्यूज : भरधाव क्रेनच्या धडकेत पादचारी महिलेचा मृत्यू झाला.(Women accident) ही घटना गुरुवारी (दि. 8) सकाळी खेड तालुक्यात शिक्रापूर-चाकण रोडवर घडली.

रुक्मिणी व्यंकट तेलंगे (वय 40, रा. चिखली) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी हनुमंत व्यंकट तेलंगे (वय 22) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.(Women accident) त्यानुसार एमएच 14/जीएन 9475 या क्रमांकाच्या क्रेन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune Ganpati Visarjan 2022 : विसर्जन मिरवणुकीचे खास फोटो तुमच्यासाठी!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची आई रुक्मिणी तेलंगे गुरुवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास सोनवणे वस्ती येथून पायी चालत जात होत्या. त्यावेळी आरोपीने त्याच्या ताब्यातील क्रेन भरधाव वेगात चालवून रुक्मिणी यांना पाठीमागून धडक दिली. त्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या रुक्मिणी यांचा मृत्यू झाला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.