Chain snaching : प्रवासादरम्यान महिलेची सोनसाखळी चोरीला

एमपीसी न्यूज : पुणे मनपा ते भोसरी या दरम्यान पीएमपीएमएल बसने प्रवास करत असताना प्रवासी महिलेच्या गळ्यातील 40 हजारांची सोनसाखळी चोरट्यांनी चोरून नेली.(Chain snaching) ही घटना रविवारी (दि. 4) सायंकाळी घडली.

Marunji garbage issue : उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

याप्रकरणी महिलेने अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुरुवारी (दि. 8) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला रविवारी सायंकाळी साडेचार वाजता पुणे मनपा बस थांबा येथून भोसरी कडे पीएमपीएमएल बसने निघाल्या.(Chain snaching) त्या सायंकाळी पावणे सहा वाजता भोसरी येथे पोहोचल्या. या प्रवासात त्यांच्या गळ्यातील 40 हजारांची सोनसाखळी अज्ञात चोरट्याने चोरून नेली.याप्रकरणी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.