Pimple Gurav : चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्टतर्फे चार युवकांना खाद्यपर्थाची गाडी

एमपीसी न्यूज – चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्टतर्फे चार युवकांना खाद्यपर्थाची गाडी उपलब्ध ( Pimple Gurav ) करुन देण्यात आली.

सचिन येडे, स्वाती राऊत, दिलीप खंदारे, अखिल चिंचवडे यांना अंडाभुर्जीची गाडी उपलब्ध करून दिली आहे. या गाड्यांचे वाटप पिंपळे गुरव येथे ट्रस्टचे सचिव विजय जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.

Pimpri : दिव्यांग भवनात शीघ्र निदान व शीघ्र उपचार केंद्र

यावेळी चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्टचे खजिनदार अमोल उंद्रे, एन.एसी.सी. समन्वयक तथा वेंकीजचे सरव्यवस्थापक प्रसन्न पेडगावकर, मनीष कुलकर्णी, योगेश चिंचवडे, दिपक भोंडवे, सोमनाथ भोंडवे, अनुराग चिंचवडे, भूषण चिंचवडे, सौरभ गावडे, राहुल चिंचवडे, सिद्धार्थ शेलार, कुणाल भोंडवे, विकी गायकवाड, दिनेश कनेटकर उपस्थित होते.

कोणताही मोठा व्यवसाय हा एका दिवसात निर्माण होत नाही. व्यवसायाला मोठे करण्यासाठी अपार मेहनत घेवून त्यात सातत्य ठेवावे लागते. व्यावसायिक वाटचालीमध्ये सगळेच दिवस सारखे नसतात. अपयशाने खचून न जाता सचोटीने आपला व्यवसाय सुरु ठेवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत. या संघर्षातूनच यशस्वी उद्योजक निर्माण होत असतो, असे मार्गदर्शन चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव विजय जगताप ( Pimple Gurav ) यांनी केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.