Pimple Gurav : राहुल गांधी यांच्या दीर्घायुष्यासाठी राजीव गांधी प्रतिष्ठानतर्फे माउलींना साकडे

एमपीसी न्यूज -अखिल भारतीय काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त स्व. राजीव गांधी प्रतिष्ठान व चिंचवड ब्लॉक कमिटीच्या वतीने बुधवारी (दि. 19) रोजी आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या समाधीवर महाअभिषेक करण्यात आला.

राहुल गांधी यांना चांगले आरोग्य व दीर्घायुष्यासाठी व त्यांच्या नेतृत्वाला खंबीर बळकटी मिळावी यासाठी माऊलींच्या संजीवन समाधीवर प्रार्थना करण्यात आली. याप्रसंगी प्रतिठानच्या वतीने युवकांना हरीपाठाची पुस्तके व शंभर पसायदानाच्या प्रती वाटप करण्यात आल्या.

यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदेशकुमार नवले, काँग्रेसचे नेते आबा खराडे, महाराष्ट्र प्रदेश पर्यावरण सरचिटणीस दीपक थोरात, चिंचवड विधानसभा युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहित शेळके, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते महाराज, चिंचवड विधानसभा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सौरभ शिंदे, पिंपळे गुरव-सांगवी युवक उपाध्यक्ष अरनव कामठे, जयराम शिंदे, कृष्णा लोखंडे, विलास साळुंखे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.