Chinchwad : काँग्रेसचे थेरगाव येथे जेल भरो आंदोलन

एमपीसी न्यूज – शहर काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली थेरगाव येथे जेल भरो आंदोलन करण्यात आले. (Chinchwad) काँगेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यामुळे काँग्रेसकडून राज्यभर आंदोलन केले जात आहे. पिंपरी-चिंचवड शहरात देखील जेल भरो आंदोलन, स्वाक्षरी मोहीम, मूक मोर्चा अशी आंदोलने केली जात आहेत.

पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसकडून नाशिक फाटा, कासारवाडी येथे स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. पिंपरी मार्केट मध्ये मूक मोर्चा काढण्यात आला. तसेच डांगे चौक, थेरगाव येथे जेल भरो आंदोलन करण्यात आले. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून ठिकठिकाणी आंदोलने केली जात आहेत. राहुल गांधी आगे बढो, हम तुम्हारे साथ है, लोकशाही पे हुकूमशाह नहीं चलेगी, अशा घोषणा या आंदोलनाच्या वेळी देण्यात आल्या.

Vadgaon Maval : मोरया प्रतिष्ठानतर्फे पीएमपीएमएल बस पास सेवा केंद्राची सुरुवात

शहराध्यक्ष कैलास कदम म्हणाले, “सत्ताधाऱ्यांनी लोकशाहीची हत्या केली आहे. राहुल गांधी यांनी सत्ताधाऱ्यांना हजारो कोटी रुपयांबाबत प्रश्न विचारला. देशातील वाढती महागाई, (Chinchwad) बेरोजगारी याबाबत काँग्रेसकडून आवाज उठवला जात आहे. त्यामुळे सरकार राहुल गांधी यांचा आवाज दडपण्याचे काम करत आहे.

पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा परिसरातून एक लाख पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवण्यात येणार आहेत. त्या पत्रांमध्ये सर्वसामान्य नागरिक त्यांच्या भावना पंतप्रधान मोदी यांच्याकडे मांडणार असल्याचेही कैलास कदम म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.