BJP : संजय राऊत यांना हेच दंगे म्हणायचे होते का?- किरीट सोमय्या

एमपीसी न्यूज : संजय राऊत म्हणत होते की,आता दंगे सुरू होणार (BJP) आहेत. संजय राऊत यांना हेच दंगे म्हणायचे होते का? मी पुन्हा एकदा सांगतो की, संजय राऊत हे शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्या वतीने सांगत होते. आता पुढे दंगलीच सुरू होणार आहेत. ही जी दंगल आहे. ती त्यातील आहे का? असा सवाल भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी उपस्थित करत महाविकास आघाडीच्या नेत्यांवर निशाणा साधला.

छत्रपती संभाजीनगर येथे दोन गटात वाद निर्माण झाला असून त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्या प्रश्नावर किरीट सोमय्या यांनी पुण्यात भूमिका मांडली.

Pune : खासदार गिरीश बापट यांच्या कुटुंबीयांची किरीट सोमय्या यांनी घेतली सांत्वनपर भेट

पुणे शहराचे खासदार गिरीश बापट यांचे काल निधन झाल्याची घटना घडली. त्या पार्श्वभूमीवर आज भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी गिरीश बापट यांच्या कुटुंबीयांची (BJP) सांत्वनपर भेट घेतली. त्यावेळी त्यांनी गिरीश बापट यांच्याबद्दलच्या आठवणींना किरीट सोमय्या यांनी उजाळा दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.