Pimple Gurav : कविता हा मनाचा हुंकार – ललिता सबनीस

एमपीसी न्यूज – कविता हा मनाचा हुंकार असतो! संस्कृतीची अक्षरबद्ध संवेदना (Pimple Gurav) असलेली कविता मनामनाला जोडते,असे विचार ज्येष्ठ लेखिका आणि कवयित्री ललिता सबनीस यांनी सृष्टी चौक, पिंपळे गुरव येथे रविवार (दि.29) व्यक्त केले.

काव्यात्मा साहित्य परिषद, पुणे या संस्थेच्या वतीने आयोजित (Pimple Gurav) करण्यात आलेल्या काव्यजागर कविसंमेलन आणि सन्मान सोहळ्यात ललिता सबनीस बोलत होत्या. विश्वरत्न इंग्लिश मीडियम स्कूल चे संस्थापक व्यंकटराव वाघमोडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते; तसेच मराठवाडा जनविकास मंचचे संस्थापक – अध्यक्ष अरुण पवार, काव्यात्मा साहित्य परिषदेचे अध्यक्ष आत्माराम हारे, उपाध्यक्ष संजय साळुंखे, सचिव शामराव सरकाळे आदी उपस्थित होते.

Maratha Reservation :आमदार प्रकाश सोळंकेंच्या घरावर मराठा आंदोलकांची दगडफेक, गाड्याही जाळल्या

काव्यजागर कविसंमेलनात शोभा जोशी, प्रज्ञा दिवेकर, नंदकुमार मुरडे, प्रदीप गांधलीकर, अनिल नाटेकर, दत्तू ठोकळे, कैलास भैरट, विजय जाधव, उमेंद्र बिसेन, राहुल भोसले, जितेंद्र चौधरी, भगवान गायकवाड, सुनीता घोडके, किसन म्हसे, नितीन भोसले, अरुण घोडके यांच्यासह सुमारे चोवीस कवींनी मुक्तच्छंद, गीत, गझल, विडंबन अशा प्रकारातील वैविध्यपूर्ण आशयांच्या कवितांचे प्रभावी सादरीकरण केले.

छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आणि वृक्षाचे पूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. आत्माराम हारे यांनी प्रास्ताविक केले. भरत बारी यांनी सूत्रसंचालन केले. शामराव सरकाळे यांनी आभार मानले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.