Pimple Nilakh News : शहिद अशोक कामटे उद्यानातील हत्ती शिल्प हटवण्यासाठी 14 डिसेंबर रोजी रयत स्वाभिमानी संघटनेचे आमरण उपोषण

एमपीसी न्यूज : पिंपळे निलख (Pimple Nilakh News) येथील शहिद अशोक कामटे उद्यानातील हत्ती हटवा, अशी मागणी रयत स्वाभिमानी संघटनेचे रविराज काळे यांनी केली होती. त्याबाबत त्यांनी ई-मेल द्वारे पिंपरी चिंचवड मनपा प्रशासक आणि आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन दिले होते, तर लेखी निवेदन ‘ड’ प्रभाग अधिकारी उमाकांत गायकवाड (सहाय्यक आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका) यांना दिले होते. परंतु, त्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने उद्या 14 डिसेंबर रोजी रविराज काळे आमरण उपोषणाला बसणार असण्याची माहिती त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

पिंपळे निलख येथील शहिद अशोक कामटे उद्यानात हत्ती बसवण्यात आला आहे. तो हत्ती लवकरात लवकर हटवण्यात यावा. कारण येथे असलेल्या राजमाता जिजाऊ उद्यानास डायनासोर गार्डन या नावाने ओळखले जाते. त्याचे कारण तेथे असलेले हे विशाल विशाल शिल्प. मग त्या उद्यानास राजमाता जिजाऊचे नाव देण्याचा हेतू साध्य झाला का हा प्रश्न पडतो? फक्त राजकीय पोळी भाजण्यासाठी राजमाता यांचे नाव दिले हा एक संशोधनाचा विषय आहे. त्याच प्रमाणे पिंपळे निलख येथील शहिद अशोक कामटे उद्यानात देखील असाच हत्ती बसवण्यात (Pimple Nilakh News) आला आहे. यातील हत्तीचे अजून उद्धघाटन झाले नाही. हा हत्ती काढण्यासाठी ‘ड’ प्रभाग तीन ते चार वेळा जनसंवाद सभेत हा प्रश्न उपस्थित केला आहे. परंतु, त्यावर कसल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही.

Pimpri News : चंद्रकांत पाटील यांच्या दौऱ्यावेळी आंदोलन करणाऱ्या शंभरहून अधिक आंदोलकांवर गुन्हा दाखल

त्यांच्या प्रमुख मागण्या –
1) शहिद अशोक कामटे उद्यानातील हत्ती लवकरात लवकर हटवण्यात यावा.
2) उद्यानातील पथदिव्यांची संख्या वाढवण्यात यावी.
3) सुरक्षा रक्षक यांची संख्या वाढवावी.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.