Bhosari : भांडणात दुसऱ्याची बाजू घेतली म्हणून दोघांना मारहाण

एमपीसी न्यूज – भांडणात मध्यस्थी (Bhosari) करत दुसऱ्याची बाजू घेतली म्हणून सहा जणांनी मिळून दोघांना बेदम मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 11) रात्री पावणे आठ वाजता सेक्टर नंबर सात, एमआयडीसी भोसरी येथे घडली.

आकाश चंद्रकांत तापकीर (वय 23, रा. तापकिरनगर, मोशी), धवल सोंडेकर अशी मारहाण झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी आकाश तापकीर यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तेजस काकडे, सिद्धेश काळे, सुदर्शन काळे, स्वराज हुलावळे, साहिल शिंदे, प्रतीक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pimple Nilakh News : शहिद अशोक कामटे उद्यानातील हत्ती शिल्प हटवण्यासाठी 14 डिसेंबर रोजी रयत स्वाभिमानी संघटनेचे आमरण उपोषण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री पावणे आठ (Bhosari) वाजताच्या सुमारास फिर्यादी आणि त्यांचा मित्र धवल एमआयडीसी भोसरी मधील सेक्टर सातमध्ये रस्त्याने जात होते. त्यावेळी आरोपींनी दोघांना अडवले. भांडणात लिखित साळुंखे याची बाजू का घेतली व मध्यस्थी का केली या कारणावरून आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या मित्राला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आरोपी सिद्धेश काळे याने लाकडी बांबूने आकाश यांना मारून गंभीर दुखापत केली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.