Pimple Saudagar : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून नागरिकाची 38 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज –   सोशल मिडीयावर शेअर मार्केटची जाहिरात करून ( Pimple Saudagar ) नागरिकाची 38 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. हा सारा प्रकार 14 डिसेंबर 2023 ते आज अखेरपर्यंत पिंपळे सौदागर येथे घडली.

याप्रकरणी गुरुवारी (दि.21) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यावरून जीतू शर्मा ,आर्यन खान, मुतू कुमार,डेव्हिन पेटीयार, सुझान बेलमी  व महिला आरोपी याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Alandi : छत्रपती शिवाजी स्मारक परिसरात पालिकेच्या वतीने वृक्षारोपण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी सोशल मिडीयावर शेअर मार्केटची जाहिरात केली. यामध्ये जास्त पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवले. एका व्हाॅट्सअप ग्रुपवर जॉईन केले. तेथे त्यांना वेगवेगळ्या बँक खात्यावर पैसे पाठवण्यास सांगितले. मात्र फिर्यादी यांना कोणताही परतावा न देता 38 लाख 6 हजार 134 रुपयांची फसवणूक केली आहे. यावरून सांगवी  पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ( Pimple Saudagar ) केला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.