Alandi : छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरात पालिकेच्या वतीने वृक्षारोपण

एमपीसी न्यूज : आळंदी नगरपरिषदेच्या (Alandi) हद्दीत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसराच्या सुशोभीकरण काम सुरू असून मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी या कामास भेट देवून पाहणी केली व संबंधित कार्य करणाऱ्यांना योग्य त्या सूचना केल्या.

तसेच काल दि.21 रोजी ‘माझी वसुंधरा अभियान 4.0’ व ‘स्वच्छ सर्वेक्षण 2024’ अंतर्गत आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी जागतिक वन दिनानिमित्त पालिकेच्या वतीने व नागरिकांच्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा(स्मारक) परिसरात वृक्षारोपण केले.

Chinchwad : : गाडीवर लघुशंका करणाऱ्या श्वानाला हटकले म्हणून श्वान मालकाकडून एकाला मारहाण व शिवीगाळ

छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरात सुशोभिकरण (Alandi) होत असल्याने तेथील परिसराच्या सौंदर्यात भर पडणार आहे. तेथील परिसर अतिक्रमण मुक्त झाल्याने व होत असलेल्या सुशोभीकरणाच्या कामामुळे अनेक नागरिकांकडून त्या कार्याचे कौतुक होत आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.