Chinchwad : : गाडीवर लघुशंका करणाऱ्या श्वानाला हटकले म्हणून श्वान मालकाकडून एकाला मारहाण व शिवीगाळ

एमपीसी न्यूज – गाडीवर श्वानाने लघुशंका केली असता गाडी (Chinchwad ) मालकाने श्वान मालकाला याबाबत हटकले. हटकल्याचा राग आल्याने श्वान मालकाने गाडी चालकाला मारहाण व शिविगाळ केली. ही घटना गुरुवारी (दि.21) चिंचवड येथे घडली.

यावरून अतुल गुलाब लोंढे (वय 36 रा. वाकड) यांनी चिचंवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यावरून धनंजय कालीदास यादव व त्याच्या आईवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Bavdhan : अनुसुचीत जातीच्या शेतकऱ्याची जमीन हडपून जिवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल दोघांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पिकअपची वाट बघत गाडीत बसले होते. .यावेळी श्वानाने त्यांच्या गाडीवर लघुशंका केली. यावेळी फिर्यादीने आरोपीला  गाडीवर कुत्रे लघुशंका करत आहे दिसत नाही का विचारले, याचा राग आल्याने त्याने लाथाबुक्क्यांनी व श्वानाच्या बेल्टने मारहाण केली तसेच आरोपीच्या आईने शिवीगाळ केली. यावरून चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला (Chinchwad ) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.