Zomato : शाकाहारी ग्राहकांसाठी झोमॅटोची वेगळी सेवा

एमपीसी न्यूज – झोमॅटो कंपनीने देशातील शाकाहारी नागरिकांची मागणी लक्षात घेऊन एक वेगळी ( Zomato) सेवा सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. पुढील आठवड्यापासून ही सेवा झोमॅटो सुरु करणार आहे.

शाकाहारी भोजन पुरविणऱ्या कर्मचाऱ्यांचा गणवेश हिरवा होता, मात्र या विषयावर नागरिकाकडून बरीच टीका झाल्यानंतर झोमॅटो कंपनीने सर्वच कर्मचाऱ्यांचा गणवेश लाल रंगाचा असेल म्हटले आहे. यामुळे भेदभाव होईल अशी मते अनेकांनी व्यक्त केली. त्यानंतर कंपनीने आपला निर्णय बदलला आहे.

Pimple Saudagar : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून नागरिकाची 38 लाखांची फसवणूक

https://x.com/zomato/status/1770815979343294549?s=20

आता डिलिव्हरी बॉईज पूर्वीप्रमाणे लाल टी-शर्ट घालतील. कंपनी शाकाहारींसाठी स्वतंत्र फ्लीट (वेगळा डिलिव्हरी बॉय) सुरू ठेवणार आहे. मात्र या ताफ्यात हिरवा रंग वापरला जाणार नाही. तळागाळातील भेदभाव दूर करण्यासाठी कंपनीने हे केले आहे. कंपनीचे सर्व रायडर्स लाल पोशाख परिधान करतील.

पूर्वी डिलिव्हरी बॉईजसाठी हिरव्या टी-शर्टचा ड्रेस कोड ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता, जो आता मागे घेण्यात आला आहे. याआधी फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोने भारतात 100 टक्के शाकाहारी आहाराचे पालन करणाऱ्या ग्राहकांसाठी प्युअर व्हेज मोड आणि प्युअर व्हेज फ्लीट ( Zomato) लाँच केले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.