Pimple Saudagar News : उन्नति सोशल फाउंडेशनच्या वतीने वसुबारस उत्साहात साजरी

एमपीसीन्यूज : पिंपळे सौदागर येथील उन्नति सोशल फाउंडेशनच्या वतीने वसुबारस उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे आणि संस्थापक अध्यक्ष संजय भिसे यांच्या हस्ते गाई आणि वासराचे पूजन करण्यात आले.

कोविड नियमांचे पालन करुन वसू बारस साजरी करण्यात आले. उन्नति सोशल फाउंडेशनच्या वतीने दर वर्षी पारंपरिक पद्धतीने हा सण साजरा केला जातो.

वसुंधरा स्थिर आहे. या पृथ्वीचे प्रतिक म्हणजे सर्व प्राण्यांमधील श्रेष्ठ गाय, जी मनुष्याच्या बरोबर राहू शकते. तिची पूजा करणे हे पृथ्वीची पूजा करण्यासारखे आहे. यामुळेच वसुबारसेला सवत्स गायीची पूजा करणे आपल्या संस्कृतीमध्ये श्रेष्ठ मानले जाते.

एकादशीपासून पुढील सहा किंवा सात दिवस सतत  दिव्यांचीओळ (आवलि) लावून तेजाची उपासना करणे अपेक्षित असते. म्हणून हा उत्सव दिपावलीच्या रुपात साजरा  करतात.

उन्नती सोशल फाउंडेशन अध्यक्षा कुंदा भिसे म्हणाल्या,  यंदाच्या दिवाळीत नागरिकांनी कोविडविषयक प्रतिबंधात्मक खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे. सुरक्षित अंतर, सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कचा वापर करावा. वारंवार साबणाने हात धुवावेत. फटाक्यांच्या धुराचा कोरोनाग्रस्त रुग्णांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे  फटाक्यांचा कमीत कमी वापर करावा. दिपावली हा प्रकाशाचा उत्सव मानला जातो. कोरोना आजारामुळे परिणाम झालेल्या अनेकांना फटाक्यांच्या धुरामुळे वायू प्रदूषणाचा थेट परिणाम होऊन त्रास होण्याची भिती आहे. ही बाब विचारात घेऊन नागरिकांनी फटाके फोडण्याचे टाळावे, असे आवाहन भिसे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.