Chakan crime News : तोंडावर मिरची पूड टाकून साडेपाच लाखांची रोकड पळवली

एमपीसी न्यूज – मोकळ्या जागेत कारमध्ये बसलेल्या चालकाच्या तोंडावर मिरची पूड टाकून कारमधून अज्ञात चोरट्यांनी 5 लाख 58 हजार 900 रुपयांची रोकड चोरून नेली. ही घटना बुधवारी (दि. 11) सकाळी अकरा वाजताच्या सुमारास महाळुंगे येथे घडली.

सचिन भास्कर पाले (वय 26, रा. सिडको, वाळूंज एमआयडीसी, औरंगाबाद) यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास फिर्यादी सचिन हे महाळुंगे गावातील इंड्यूरन्स कंपनीच्या समोरील मोकळ्या जागेत कार (एम एच 20 / एफ पी 2051) पार्क करून कारमध्ये बसले होते. त्यावेळी अज्ञात आरोपी तिथे आले.

त्यांनी सचिन यांच्या तोंडावर मिरची पूड टाकली. त्यानंतर कारमध्ये सीटच्या खाली ठेवलेली 5 लाख 58 हजार 900 रुपयांची रोख रक्कम असलेली सुटकेस चोरट्यांनी चोरून नेली.

चाकण पोलीस तपास करीत आहेत

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.