Pimple Saudagar News : लॉकडाऊन काळात गरजूंना मदत करणाऱ्यांचा कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मान

एमपीसीन्यूज : पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फाऊंडेशनचे संस्थापक संजय भिसे व अध्यक्षा कुंदा भिसे यांच्या वतीने कोरोना महामारीच्या काळात समाजातील अनेक घटकांना विविध प्रकारे मदत करणाऱ्या मान्यवरांना कोरोना योद्धा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी लॉकडाऊन काळात गरजूंना रोज जेवणाचे डबे पुरविणारे रवि मुंढे, भारत लोहीया, मोहित अग्रवाल, उषा अग्रवाल, दीक्षा केजरीवाल, पाटील मॅडम, विजया काटे, पंकज देशमुख, संतोष कवडे, प्रसाद पाखरे, ललित केरीवाल व अभिजित धारूनकार यांना कोरोना योद्धा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

_MPC_DIR_MPU_II

कोरोना महामारी सुरु झाली आणि होत्याचे नव्हते झाले. अनेक कामगार अन्नावाचून भुके राहू लागले. याबाबत माहिती मिळताच रोझ आयकाॅन सोसायटीमधील दोनशे महिलांनी ३ महिन्यात २२ हजार जेवनाचे डबे पुरवले. याचा लाभ रहाटणी, पिंपळे सौदागर भागातील गरजू नागरिक आणि विद्यार्थ्यांना झाला.

उन्नती सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे म्हणाल्या, जे नागरिक स्वतःच्या जीवाची पर्वा न करता व कुटुंबाची जबाबदारी सांभाळून दुसऱ्यासाठी मदत करतात. अहोरात्र झटतात त्यांना सन्मानित करून प्रोत्साहन देणे हे आपले करत्वे आहे. म्हणून उन्नती सोशल फाऊंडेशनच्या वतीने आम्ही अशा नागरिकांचा सन्मान करणे उच्चीत समजले.

रोझ आयकॅान सोसायटीचे चेअरमन रवी मुंढे व सोसायटीतील सर्व सभासदांनी उन्नती फाउंडेशन व कुंदा संजय भिसे यांचे आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.