Pimple Saudagar News : उन्नति सोशल फाउंडेशनच्या वतीने योग दिन उत्साहात साजरा

एमपीसीन्यूज : उन्नति सोशल फाउंडेशनच्या वतीने जागतिक  योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महिलांनी विविध योगासने केली.

दर वर्षी उन्नती सोशल फाउंडेशनच्या वतीने योग दिन हा साजरा केला जातो. परंतु, या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वर्षीचा योग दिवस हा नियमांचे पालन व कमी लोकांच्या सहभागात घेण्यात आला.

फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे म्हणाल्या, 21 जून हा वर्षाचा सर्वात मोठा दिवस आहे आणि योगाचा सतत अभ्यास केल्याने त्या व्यक्तीला दीर्घ आयुष्य मिळते. यामुळे हा दिवस योग दिवस म्हणून साजरा केला जातो. योग म्हणजेच संतुलित मन, सुखी , निरोगी आणि समृध्द जिवनाचा राजमार्ग. प्रत्येकाने आपली, आपल्या परिवाराची व आपल्या सोबतच्या प्रत्येकाची काळजी घ्यावी. कारण कोरोना संकट अजुनही टळलेल नाही. त्यामुळे प्रशासनाच्या सर्व नियमांचे पालन करावे. आरोग्य ही सर्वांत मोठी भेटवस्तू आहे. संतोष ही सर्वात मोठी संपत्ती आहे, जे केवळ योगामुळेच मिळते.

फाउंडेशनचे संस्थापक संजय भिसे, आनंद हास्य क्लबचे अध्यक्ष राजेंद्रनाथ जयस्वाल व सर्व सभासद उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.