Pimple Saudagar: शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने सव्वा कोटीची फसवणूक

एमपीसी न्यूज – शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने एका (Pimple Saudagar)व्यक्तीची एक कोटी 30 लाख 38 हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना एक डिसेंबर 2022 ते 23 फेब्रुवारी 2024 या कालावधीत पिंपळे सौदागर येथे घडली.
दीपक अनंत आवटे (वय 35, रा. महाळुंगे, पुणे) यांनीही वाकड (Pimple Saudagar)पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विश्वभूषण वाल्मिक गायकवाड (वय 24, रा. पिंपरी), कुलभूषण वाल्मीक गायकवाड (वय 23, रा. पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून त्यांच्यासोबत वेळोवेळी समजूतीचा करारनामा केला. त्यानुसार फिर्यादीस त्यांच्या वी टास्क अकॅडमीच्या एस्पायर एंटरप्राईजेस या बँक खात्यावर पैसे भरण्यास भाग पाडले. फिर्यादी यांनी आरोपींच्या बँक खात्यावर एक कोटी तीस लाख 38 हजार रुपये जमा केले.
ते पैसे आरोपी पुढे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणार होते. त्या बदल्यात व्याज म्हणून आरोपींनी फिर्यादी यांना 41 लाख 65 हजार 370 रुपये पाठवले. त्यानंतर फिर्यादी यांनी दिलेल्या पैशांची परतफेड करण्यास टाळाटाळ करून त्यांची एक कोटी 30 लाख 38 हजार रुपयांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.