Pimple Saudagar : अटक करायला गेलेल्या आरोपीने घेतला पोलिसांचा चावा

एमपीसी न्यूज – धमकी व दमादाटी कऱणाऱ्या आरोपीला अटक (Pimple Saudagar) गेलेल्या पोलिसांनाच आरोपीने माराहाण करत चावा घेतला आहे. हि घाटना शुक्रवारी (दि.24) पिंपळे सौदागर येथे घडला आहे.

 

 

खंडू जालींदर लोंढे (वय 23 रा.रहाटणी) असे अटक आरोपीचे नाव असून याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार संतोष मारुती बर्गे यांनी फिर्याद दिली आहे.

 

Bhosari : पार्क केलेल्या कारमधून रोख रक्कम व लॅपटॉप चोरीला

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व पोलीस शिपाई खेडकर हे वाकड पोलीस ठाण्यातील गुन्ह्याचा तपास करत असताना त्यांना  आरोपी चौकात दिसल्याने पोलिसांनी त्याच्याकडे गुन्ह्याविषयी चौकशीसाठी पोलीस  ठाण्यात चलण्यास सांगितले असता आरोपी हा पळून जाऊ लागला. त्याचा पाठलाग करून त्याला पकडले असता त्याने फिर्यादी व खेडकर यांना मारहाण केली तसेच पळून जाण्यासाठी दोघांच्याही मनगटाजवळ जावा घेतला. आरोपीला अटक केली असून वाकड (Pimple Saudagar)पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.