Pimpri : आंद्रा धरणातून 50 एमएलडी पाणी उचलण्यास सुरुवात

एमपीसी न्यूज – गेल्या अनेक महिन्यांपासून उद्‌घाटनाविना (Pimpri ) रखडलेल्या चिखली जलशुद्धीकरण केंद्रातून प्रायोगिक तत्त्वावर पाणीपुरवठा सुरू केला आहे. आंद्रा धरणातून सोडलेले 45 ते 50 दशलक्ष लिटर पाणी प्रतिदिन इंद्रायणी नदीतून घेण्यास सुरूवात केली आहे. या पाण्यावर प्रक्रिया करून शहराला पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे शहरवासीयांना दिलासा मिळाला आहे.

शहराला मावळातील पवना धरणातून 510 तर एमआयडीसीकडून 30 असे 540 एमएलडी पाणी देण्यात येत होते. मात्र, त्यानंतरही शहराच्या विविध भागात अपुरा आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी सुरू होत्या. शहरासाठी मावळ तालुक्‍यातील आंद्रातून 100 तर खेड तालुक्‍यातील भामा-आसखेड धरणातून 167 असे 267 दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी कोटा मंजूर आहे. त्यासाठी चिखलीत 300 दशलक्ष लिटर क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र उभारले आहे. या जलशुध्दीकरण केंद्राचे काम पूर्ण होऊन चार ते पाच महिने झाले होते.

Film review The Kerala story : द केरला स्टोरी एका वैश्विक आतंकवादाचा पर्दाफाश

मात्र, भाजपच्या मंत्र्यांना वेळ मिळत नसल्याने जलशुध्दीकरण केंद्राचे उद्‌घाटन रखडले होते. त्यामुळे पाणी सुरू करण्यात आले नव्हते. असे असतानाच महापालिकेने प्रायोगिक तत्वावर 45 ते 50 एमएलडी अशुद्ध जलउपसा केला जात आहे. इंद्रायणी नदीवर निघोजे बंधाऱ्यातून पंपाद्वारे उचलून ते चिखली जलशुद्धीकरण केंद्रात आणले जात आहे. तिथे प्रक्रिया झाल्यानंतर जलवाहिन्यांद्वारे पाणी शहराला वितरित केले जात आहे.

चिखली जलशुद्धीकरण केंद्रांतर्गत 267 दशलक्ष लिटर पाणी प्रतिदिन तळवडे, चिखली, मोशी, डुडुळगाव, चऱ्होली, दिघी, बोपखेल या गावांसह भोसरीचा काही भाग आणि प्राधिकरण सेक्‍टर एक ते 16 भागात पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे सद्यःस्थितीत (Pimpri ) या भागात पुरविले जाणारे पाणी शहराच्या अन्य भागात वितरित केले जाणार आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.