Pimpri : ग्लोबल टॅलेंट इंटरनॅशनल स्कूल मध्ये 77 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज – ग्लोबल टॅलेंट इंटरनॅशनल स्कूलने मंगळवारी (दि.15) शाळेच्या आवारात 77 वा स्वातंत्र्य दिन गौरव आणि अभिमानाने साजरा (Pimpri) केला. कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्यांचे स्वागत करून आणि ध्वजपूजन व ध्वजारोहणाने करण्यात आली. सर्वांनी राष्ट्रगीत गायले आणि राष्ट्रध्वजाला वंदन केले. राष्ट्रगीतानंतर जीटीआयएसचे शिक्षक क्षितिजा गिरी, स्नेहल कुलकर्णी आणि मिनाक्षी कदम यांनी ध्वजगीत गायले. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या अभिमानाने आणि शिस्तीने मार्च पास्ट दाखवला. टीम GTIS तर्फे सर्व पाहुण्यांना प्रेमाचे प्रतीक देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी  GTIS ला डॉ. अशोक नगरकर, संजय सुरेश जैन आणि डॉ. दिलीप कामत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच संस्थापक डॉ. ललितकुमार धोका, व्यवस्थापकीय संचालक डॉ. स्वप्नाली धोका, प्राचार्या विद्युत सहारे, शिक्षक व पालक उपस्थित होते.

प्रमुख पाहुण्यांचा लिन्सी बिनॉय व कीर्ती महाजन यांनी थोडक्यात परिचय करून दिला. डॉ. अशोक नगरकर सरांनी पुणे विद्यापीठातून M.Sc Ph.D पूर्ण केले. सध्या पुण्यात ज्येष्ठ शास्त्रज्ञ म्हणून गेल्या 37 वर्षांपासून कार्यरत असून, विविध संरक्षण तंत्रज्ञानातील संशोधनासाठी आपले आयुष्य वेचत आहे. त्यांनी डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम सर यांच्यासोबत 8 वर्षे काम केले.

संजय सुरेश जैन हे एक प्रतिष्ठित बांधकाम व्यावसायिक आणि प्रवर्तक आहेत, ते जैन सोशल पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष, जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनचे उपाध्यक्ष आहेत.डॉ. दिलीप कामत  हे पॅट्रन इंडियन मेडिकल असोसिएशनचे संस्थापक (Pimpri) अध्यक्ष आहेत. ते पुण्यात प्रसूती आणि स्त्रीरोग संस्थेचे माजी अध्यक्ष आहेत.

Pune : डॉ.पं.नंदकिशोर कपोते यांना पं. विष्णु दिगंबर पलुसकर संगीत रत्न पुरस्कार प्रदान          

विद्यार्थ्याच्या स्वागत गीताने सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात झाली. पूर्वप्राथमिक आणि प्राथमिक अशा दोन्ही विभागातील विद्यार्थ्यांनी भाषणे दिली आणि स्वातंत्र्यसैनिकांचे रोल प्ले सादर केले. इयत्ता तिसरी आणि चौथीच्या विद्यार्थ्यांनी नृत्य सादरीकरण केले.

नृत्य सादरीकरणाने उपस्थित प्रत्येकजण देशभक्तीपूर्ण बनला आणि वातावरण ऊर्जा आणि उत्साहाने भरले होते. इयता 6 वी ते 9 वीच्या विद्यार्थ्यांनी “नशा मुक्त भारत” या विषयावर नाटक सादरीकरण केले. उत्सवासाठी उपस्थित असलेल्या प्रत्येकाला ते माहितीपूर्ण वाटले. इयता दुसरी च्या विद्यार्थ्यांनी कवायतीचे प्रदर्शन केले.

हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी या प्रसंगी उत्कृष्ट मल्लखांबची प्रस्तुती केली. पूनम शेलकर यांनी मल्लखांब बद्दल थोडक्यात परिचय करून दिला. नंतर पाहुण्यांनी Iqube विषयात 80% पेक्षा जास्त गुण मिळवलेल्या आणि शिष्यवृत्तीची रक्कम मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला. शैक्षणिक सत्र 2023-24 साठी GTIS शाळेचे मासिकाचे उद्घाटन करण्यात आले.

GTS चे संचालक डॉ. ललित कुमार धोका यांनी पालकांना संबोधित केले आणि उपस्थित पाहुण्यांचे आभार मानले. मुख्याध्यापिका विद्युत सहारे यांनीही या सोहळ्यासाठी उपस्थित सर्वांचे आभार मानले आणि विद्यार्थ्याना सर्व बाबतीत सर्वोत्तम कामगिरी करण्यास प्रोत्साहित केले.

डॉ. दिलीप कामत यांनी सर्वांना संबोधित केले आणि पालकांना आवाहन केले की मुलांमध्ये आपल्या राष्ट्राविषयीची मूल्ये रुजवावीत आणि त्यांना भारतीय इतिहासाची सुरुवातीपासून माहिती द्यावी. त्यांनी GTIS च्या टीमचे आभार मानले की त्यांनी असे अप्रतिम सोहळे आयोजित केले आणि विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्याना त्यांचा देश जाणून (Pimpri) घेण्यासाठी प्रोत्साहित केले.

Chinchwad : पतीने झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात घातला सिमेंटचा गट्टू, पत्नी गंभीर जखमी

डॉ. अशोक नगरकर यांनी सर्व विद्यार्थ्यांना शास्त्रज्ञ म्हणून आपले करिअर निवडण्यासाठी आणि सोप्या प्रकल्पांसाठी संशोधनावर काम करण्यास प्रवृत केले. संजय सुरेश जैन यांनी सर्वांना संबोधित करून अतिशय चांगले सांगितले की एक जबाबदार नागरिक या नात्याने आपण सर्वांनी छोटी-छोटी कामे करून आपली संस्कृती टिकवून राष्ट्रासाठी योगदान दिले पाहिजे,असेही त्यांनी सांगितले.

इयत्ता 8 चे पालक देखील पुढे आले आणि त्यांनी GTIS टीमचे त्यांच्यापाठिंब्याबद्दल आभार मानले आणि विद्यार्थ्यांमध्ये मूल्ये रुजवण्यासाठी असे कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल शाळेचे कौतुक केले. कार्यक्रमाची सांगता सकारात्मकतेने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुनम शेलकर, लिन्सी बिनाय, किर्ती महाजन यांनी केले. पार्वती रावत यांनी आभार मानले. संगीत शिक्षकांनी वंदे मातरम् गायन करून उत्सवाची सांगता (Pimpri) केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.