Pune : डॉ.पं.नंदकिशोर कपोते यांना पं. विष्णु दिगंबर पलुसकर संगीत रत्न पुरस्कार प्रदान          

एमपीसी न्यूज –  अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ (Pune) यांच्या वतीने पं.विष्णु दिगंबर पलुसकर यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त कला क्षेत्रातील नामवंत कलाकारांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

नृत्य क्षेत्रात आंतरराष्ट्रीय किर्ती चे प्रसिद्ध कथक नर्तक डॉ.पं.नंदकिशोर यांना पं. विष्णु दिगंबर पलुसकर संगीत रत्न पुरस्कार देऊन अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाच्या वतीने शनिवार (दि.19)  ऑगस्ट रोजी वाशी, मुंबई येथे सन्मानित करण्यात आले. या वेळी रंगमंचावर पद्मश्री डॉ.पुरू दाधीच, अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब सुर्यवंशी, सचिव सुधाकर चव्हाण, रजिस्ट्रार विश्वास जाधव  आदी उपस्थित होते.

Pimpri : हिंजवडीसह ‘ही’ सात गावे लवकरच पिंपरी महापालिकेत

संपूर्ण भारतातून नृत्य क्षेत्रातील केवळ सात नृत्य कलाकारांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. यामध्ये पुणे जिल्ह्यातून केवळ एकमेव  कथक नर्तक डॉ.पं.नंदकिशोर यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली हे विशेष.

डॉ.पं.नंदकिशोर कपोते यांना  नुकताच भारत सरकार चा संगीत नाटक अकादमी हा कलाक्षेत्रातील सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान दिल्ली येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते मिळाला आहे. डॉ.पं.नंदकिशोर हे डॉ.डी.वाय.पाटील विद्यापीठ  लिबरल आर्ट्स येथे संचालक म्हणून कार्यरत (Pune) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.