Pimpri : श्रावणी सोमवारनिमित्त शिवमंदिरात भाविकांची गर्दी

एमपीसी   न्यूज –   हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र असलेल्या श्रावण महिन्याला प्रारंभ झाला आहे. आज श्रावणातील पहिला सोमवार असल्याने पिंपरी-चिंचवड शहरातील विविध महादेव मंदिरातही भाविकांची दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र होते. 

चिंचवडच्या सर्वांत जुन्या धनेश्वर मंदिरासह, पिंपरी गावातील पवनेश्वर, पिंपळे सौदागर येथील महादेव आणि शंकरवाडी अशा विविध मंदिरांची पहिल्या श्रावण सोमवारनिमित्त शहरातील सर्व मंदिरामध्ये गर्दी दिसून आली. पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. श्रावणनिमित्त सर्वत्र धार्मिक व भक्तिभावाचे वातावरण बनले आहे. पान-फूल, बेलपत्र आणि दुधाचा नैवेद्य घेऊन अनेक महिला शंकराचे पूजन करत होते. पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. श्रावणनिमित्त  सर्वत्र धार्मिक व भक्तिभावाचे वातावरण बनले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.