Pimpri : अहंकाराचा त्याग करा – हभप नील महाराज करंजकर

एमपीसी न्यूज – मनुष्याला गर्व, अहंकार झाला की त्याची (Pimpri)वर्तणूक बिघडते. याचा परिणाम त्याच्या संपूर्ण जीवनावर होतो. त्यामुळे गर्व आणि अहंकाराचा त्याग केला पाहिजे. सर्वांशी आदराने आणि प्रेमाने वागले पाहिजे.

त्यातूनच आपला उत्कर्ष होऊ शकतो. वादातून काहीही निष्पन्न होत नाही. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींवर वाद घालण्यापेक्षा समजूतीने वागले पाहिजे. यातच सर्वांचे हित आहे, असे मार्गदर्शन बाल कीर्तनकार ह.भ.प. नील महाराज करंजकर यांनी विद्यार्थ्यांना केले.

 

अयोध्येत श्रीराम लल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना सोमवारी (Pimpri)पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यानिमित्त शिक्षण प्रसारक मंडळीच्या यमुनानगर, निगडी येथील शाळेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

Pimpri : मास्टर माइंड ग्लोबल इंग्लिश स्कूल तर्फे श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्त मानवी साखळी व रॅलीचे आयोजन

यामधे सकाळी यमुनानगर परिसरातून वाजतगाजत श्रीरामाच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांसाठी बाल कीर्तनकार हभप नील महाराज करंजकर यांचे किर्तन, अयोध्येतील श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे प्रत्यक्ष प्रसारण, विद्यार्थ्यांचे श्रीरामाच्या जीवनावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम झाले.

यावेळी शि.प्र. मंडळीचे नियामक मंडळ सदस्य सुधीर काळकर, शाळा समिती अध्यक्ष ॲड. दामोदर भंडारी, मुख्याध्यापिका ज्योती बक्षी, लीना वर्तक, उमा घोळे, रविंद्र मुंगसे, सविता बिराजदार आदींसह पारंपारिक वेशभूषक बालगोपाळ बहुसंख्येने उपस्थित होते.

 

सुधीर काळकर यांनी मनोगत व्यक्त केले. ॲड. दामोदर भंडार यांनी शुभेच्छा दिल्या. प्रभु श्री रामचंद्र यांची प्रार्थना स्नेहल देशपांडे, रमा जोशी यांनी गायली. इयत्ता सातवी मधील विद्यार्थिनी अनन्या जाना हिने शंखनाद केला. शाळा समिती अध्यक्ष ॲड. दामोदर भंडारी यांच्या संकल्पनेतून सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. सूत्रसंचालन अर्चना येळे यांनी केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.